सिलिंडर स्फोटात महिला ठार

By admin | Published: July 26, 2016 01:12 AM2016-07-26T01:12:31+5:302016-07-26T01:12:31+5:30

गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात ताराबाई गायकवाड ही वृद्ध महिला ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी कल्याणच्या आधारवाडी चौकात घडली.

Kill the women in the cylinder blast | सिलिंडर स्फोटात महिला ठार

सिलिंडर स्फोटात महिला ठार

Next

कल्याण : गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात ताराबाई गायकवाड ही वृद्ध महिला ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी कल्याणच्या आधारवाडी चौकात घडली. जखमींपैकी १० जणांवर मुुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यावर बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी कसून छाननी करून स्फोटामागे घातपाताची शक्यता तपासली.
कल्याण-डोंबिवली पालिकेचे कर्मचारी रवींद्र गायकवाड (४५) यांचे आधारवाडी चौकात दुमजली घर आहे. गायकवाड कुटुंबीय वरच्या मजल्यावर राहते, तर तळमजल्यावरील तीन वेगवेगळ्या खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या आहेत. त्यापैकी मधल्या खोलीतील शेख यांच्या घरात हा स्फोट झाला. सोेमवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान शेख यांच्या खोलीतील सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्यावेळी दिव्याचे बटण चालू करताच तेथे ठिणगी उडाल्याने स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी म्हणाले.
हा स्फोट इतका मोठा की, तळमजल्यावरील सर्व भिंती कोसळल्या. त्यामुळे ढिगाऱ्यांखाली सापडून तीन खोल्यांतील रहिवासी जखमी झाले, तर ताराबाई गायकवाड (७०) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शेख कुटुंबातील सलीम शेख आणि शबाना शेख हे दोघे अनुक्रमे ७० आणि ४० टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. आजूबाजूच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले.दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपायुक्त संजय शिंदे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार अभिजित खोले, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पाहणी केली. ताराबाई गायकवाड यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली.
हा स्फोट हलगर्जीपणामुळे झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. जे. जैद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.(प्रतिनिधी)

स्फोटातील जखमी : अलका धनगर (३०), ज्योत्स्ना धनगर (१६), केतन धनगर (७), शबाना शेख (३५), सलीम शेख (४०), रेहान शेख (१०), हफरिया शेख (१५), बिभिषण आवारे (५०), अरुणा आवारे (३८), धनश्री आवारे (१८), कीर्ती आवारे (१६).

हा स्फोट इतका मोठा की, तळमजल्यावरील सर्व भिंती कोसळल्या. त्यामुळे ढिगाऱ्यांखाली सापडून तीन खोल्यांतील रहिवासी जखमी झाले, तर ताराबाई गायकवाड (७०) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: Kill the women in the cylinder blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.