मांस, चिनी औषधे, बुलेटप्रूफ जॅकेटसाठी खवलेमांजरांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:34 AM2021-02-20T02:34:00+5:302021-02-20T02:34:41+5:30

Mumbai : संपूर्ण अंगावर खवले असणारा खवलेमांजर हा एकमात्र प्राणी आहे. मोठ्या प्रमाणावर खवल्यासाठी त्यांची हत्या हाेेते. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड कमी आहे.

Killing scaly cats for meat, Chinese medicine, bulletproof jackets | मांस, चिनी औषधे, बुलेटप्रूफ जॅकेटसाठी खवलेमांजरांची हत्या

मांस, चिनी औषधे, बुलेटप्रूफ जॅकेटसाठी खवलेमांजरांची हत्या

googlenewsNext

मुंबई : मांस, चिनी औषधे व बुलेटप्रुफ जॅकेटसाठी खवलेमांजराची जगात मोठ्या प्रमाणात हत्या तसेच खवल्यासाठी तस्करी होत आहे. या प्रकारांमुळे खवलेमांजराची प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री निसर्ग मित्रने दिली.
संपूर्ण अंगावर खवले असणारा खवलेमांजर हा एकमात्र प्राणी आहे. मोठ्या प्रमाणावर खवल्यासाठी त्यांची हत्या हाेेते. त्यामुळे त्यांची संख्या प्रचंड कमी आहे. याचमुळे अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजातीच्या यादीत हा प्राणी समाविष्ट केला आहे. जगभरात खवले मांजराला वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सह्याद्री निसर्ग मित्र व वनविभाग यांच्यावतीने व पोलीस यांच्या सहकार्याने खवलेमांजर संरक्षण व संवर्धनाचे काम हाती घेण्य़ात आले आहे. खवलेमांजर कोकणात सर्वत्र आढळते. मानवाला निरुपद्रवी असा हा प्राणी असून, तो निशाचर आहे. दात नसल्यामुळे तो मुंग्या व वाळवी खातो. खवलेमांजर अन्न खाण्यासाठी आपली लांब जीभ वापरतो.
खवलेमांजराची शिकार करणे कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. खवलेमांजराची सद्यस्थिती व त्याला असणारे धोके याबाबत वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र यांनी संयुक्त उपक्रम सुरू केला असून, त्याच्या सर्वेक्षणाचे, खवले मांजर संरक्षण व संवर्धनाचे काम हाती घेण्य़ात आल्याची माहिती सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली.

Web Title: Killing scaly cats for meat, Chinese medicine, bulletproof jackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई