पश्चिम उपनगरात बोगस ‘किन्नर गँग’ची दहशत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:44 AM2017-07-28T01:44:57+5:302017-07-28T01:45:00+5:30

पश्चिम उपनगरात बनावट किन्नरांनी मिळून गँग तयार केली असून या समाजकंटकांमुळे खºया किन्नर समाजाचा अपप्रचार होत असल्याचा आरोप किन्नर माँ ट्रस्टने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

Kinar gang ,Bogus, Western city, mumbai | पश्चिम उपनगरात बोगस ‘किन्नर गँग’ची दहशत!

पश्चिम उपनगरात बोगस ‘किन्नर गँग’ची दहशत!

Next

मुंबई : पश्चिम उपनगरात बनावट किन्नरांनी मिळून गँग तयार केली असून या समाजकंटकांमुळे खºया किन्नर समाजाचा अपप्रचार होत असल्याचा आरोप किन्नर माँ ट्रस्टने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली असून आयुक्तांनी कडक कारवाईचे आश्वासन दिल्याचा दावा ट्रस्टने या वेळी केला आहे.
ट्रस्टच्या प्रकल्प समन्वयक प्रिया पाटील यांनी सांगितले की, बनावट किन्नरांच्या गँगकडून ट्रस्ट आणि विविध किन्नर संघटनांच्या पदाधिकाºयांना धमकावले जात आहे. बनावट किन्नर हे मुळात पुरुष असून लोकांना लुबाडण्याचे काम करत आहेत. घरफोड्या, लूटमार आणि हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या घटनांविरोधात आवाज उठवणाºया किन्नर समाजाला धमक्या दिल्या जात आहेत. काही कार्यकर्त्यांना तर मारहाण करून लुटण्यापर्यंतची गँगची मजल गेली आहे. त्यामुळे किन्नर समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेवटी ट्रस्टने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह सर्व पोलीस स्थानकांना तक्रारी दाखल केल्या आहेत.
ट्रस्टने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाºयांना कडक कारवाईचे आश्वासन दिल्याचे या वेळी सांगण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपर्यंत कारवाई दिसली नाही, तर सर्व किन्नर काळे कपडे परिधान करून रस्त्यावर ठिय्या देतील, असा इशारा पाटील यांनी या वेळी दिला.

पोलीस गुन्हाच
नोंदवत नाहीत!
या वेळी काही पीडित किन्नरांनी त्यांची व्यथा व्यक्त केली. त्यातील प्रियंका अत्री या पीडित किन्नरवर गँगने मिळून चाकूने वार केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियंकाला तब्बल २७३ टाके लागले होते. चार दिवस बेशुद्ध असलेली प्रियंका शुद्धीवर आल्यानंतरही दहशतीखाली होती. अशा अनेक घटना शहरात घडत असून स्थानिक पोलीस ठाण्यातून केवळ आश्वासने दिली जात असून गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप ट्रस्टने केला.

...म्हणून होत आहेत हल्ले!
पालघर जिल्ह्यात ७ हजार ५०० शौचालये उभारणाºया किन्नर माँ ट्रस्टसह विविध संघटना किन्नर समाजाला कौशल्य विकासाचे धडे देत आहेत. त्यामुळे भीक मागण्याऐवजी किन्नर स्वत:च्या पायावर उभे राहून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावू लागला आहे.
काही वेळा किन्नरांच्या समस्या सोडवण्यासाठीही संघटनेचे पदाधिकारी पुढाकार घेतात. अशा वेळी लोकांना त्रास देणाºया बनावट किन्नरांना लगाम लावण्याची मोहीमही संघटनांनी सुरू केली. त्याचाच राग मनात ठेवून या गँगने कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

कारवाई होणार का?
गोरेगाव परिसरात राहणाºया या गँगच्या सदस्यांची माहिती ट्रस्टने पोलिसांना दिलेली आहे. गंभीर बाब म्हणजे या गँगमधील बनावट किन्नरांविरोधात पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगर आणि मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. स्वत: किन्नरांनीही त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
मात्र कडक कारवाई होत नसल्याने हे बनावट किन्नर उजळमाथ्याने समाजात फिरत असल्याचा आरोप अखिल किन्नर सेवा समितीच्या सोनाली चौकेकर यांनी केला आहे.

Web Title: Kinar gang ,Bogus, Western city, mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.