सत्तेसाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग

By admin | Published: January 25, 2017 04:39 AM2017-01-25T04:39:51+5:302017-01-25T04:39:51+5:30

सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही, पण आरक्षणाने या सर्वांची गोची केली. मात्र, मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या या आरक्षणातूनही अनेकांचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

King-Queen's strong fielding for power | सत्तेसाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग

सत्तेसाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग

Next

शेफाली परब/ मुंबई
सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही, पण आरक्षणाने या सर्वांची गोची केली. मात्र, मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या या आरक्षणातूनही अनेकांचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवकपद घरातच राहावे, यासाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग सुरू आहे. प्रभाग फेररचनेने मोठी उलथापालट केली, तरी सत्तेसाठी नगरसेवक पती-पत्नीमधील ही संगीतखुर्ची कायम आहे. एवढेच नव्हे, तर या वेळीस आपल्याबरोबर पती अथवा पत्नीलाही उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांनी जोर लावला आहे. यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. वर्षानुवर्षे एकाच नगरसेवकाच्या प्रभागामधील मक्तेदारीला महिला आरक्षणाने धक्का दिला. आरक्षणात प्रभाग गेल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज बाहेर फेकले गेले. त्यामुळे नगरसेवक या पदावर आपला हक्का गाजवणारे हादरले, पण सत्तेची नशा काही सुटता सुटत नाही. त्यामुळे यापैकी अनेकांनी अन्य पर्याय अवलंबले. सत्ता आपल्याच हाती राहण्यासाठी घरच्या लक्ष्मीला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले. त्यामुळे आरक्षणाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात आहे.२००७पासून संगीतखुर्चीचा हा प्रकार वाढला. दोन-तीन टर्म सत्ता हाती आल्यामुळे पक्षात स्थान पक्के असलेल्या नगरसेवकांची दावेदारी वाढली. पक्षासाठी केलेल्या कार्याचा मोबदला पत्नीला उमेदवारी देऊन चुकता करण्याचा व्यवहार सुरू झाला. यामुळे राजकीय पक्षांमध्ये अशा दावेदारांची डोकेदुखी वाढली. फेब्रुवारी २०१७च्या निवडणुकीत प्रभाग फेररचनेने नवीन आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष धोका पत्करण्यास तयार नसल्याने, उमेदवारीचे दान अखेर अशा दावेदारांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

Web Title: King-Queen's strong fielding for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.