युद्धनौका निर्मिती विभागाच्या नियंत्रकपदी किरण देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:37+5:302021-06-01T04:06:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी सोमवारी नौदलाच्या युद्धनौका निर्मिती आणि संपादन विभागाच्या नियंत्रक पदाची ...

Kiran Deshmukh as Controller of Warship Building | युद्धनौका निर्मिती विभागाच्या नियंत्रकपदी किरण देशमुख

युद्धनौका निर्मिती विभागाच्या नियंत्रकपदी किरण देशमुख

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी सोमवारी नौदलाच्या युद्धनौका निर्मिती आणि संपादन विभागाच्या नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबईतील व्हीजेटीआय या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले देशमुख ३१ मार्च १९८६ साली अभियंता अधिकारी म्हणून नौदलात दाखल झाले. अभियांत्रिकीत उच्च शिक्षण घेतलेल्या देशमुख यांनी वेलिंग्टन येथी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ काॅलेजमधून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.

अतिविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित देशमुख यांनी नियंत्रक पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी नौदलातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच, आघाडीवरील नौदलाच्या युद्धनौकांवर विविध पातळ्यांवर सेवा बजावली आहे. यात राजपूत, दिल्ली आणि तबर श्रेणीतील युद्धनौकांचा समावेश आहे. विद्यमान नियुक्तीपूर्वी विशाखापट्टनम येथील नौदल गोदीचे अधीक्षक, नौदल प्रकल्पाचे संचालक अशा महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत होते.

......................................

Web Title: Kiran Deshmukh as Controller of Warship Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.