Join us

किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:50 PM

किरीट सोमैयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या करता शिवसेना आक्रमक झाली आहे. 

मुंबई - माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 'आयएनएस विक्रांत' जहाज वाचविण्यासाठी २०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये राजभवनाच्या नावावर गोळा करण्यात आलेले ५७ कोटी रुपये राज्यपालांकडे जमा न केल्याबद्दल किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय भावनेची शुद्ध फसवणूक केली आहे. हा देशद्रोह असून किरीट सोमैयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या करता शिवसेना आक्रमक झाली आहे. 

आमदार सुनिल प्रभु यांच्या नेतृत्वाखाली विभाग क्रमांक ३ तर्फे गोरेगाव रेल्वे स्थानक पूर्व येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी, "किरीट सोमैया हाय हाय" च्या घोषणांनी गोरेगाव स्थानक परिसर दणाणून सोडला होता.              

बोरीवलीत निषेध मोर्चा

नौदलाच्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली पैसा गोळा करुन महाघोटाळा करणाऱ्या किरीट सोमैय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तुरुंगा टाका या मागणीसाठी विभाग क्र.१ च्या वतीने भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला.

बोरिवली (पू) ओमकारेश्वर मंदिर चौक, नॅशनल पार्क समोर,  येथे आयोजित मोर्चात आमदार  प्रकाश सुर्वे, विभागसंघटक  सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक सर्वश्री संध्या दोशी, सुजाता पाटेकर, रिद्धि खुरसंगे, माधुरी भोईर, संजय घाडी,  शिवसेना प्रवक्ता संजना घाडी, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, दामोदर म्हात्रे, चेतन कदम, विनायक सामंत, विधानसभा संघटक अविनाश लाड, कर्णा अमिन, अशोक म्हामुणकर, किशोर म्हात्रे, संजय भोसले, विनोद राजेशिर्के, परेश सोनी, महिला उपविभागसंघटक मीना पानमंद, शिला गांगुर्डे, वंदना खाड्ये , अश्विनी सावंत, दिपा पाटील, शकुंतला शेलार, मनिषा सावंत, शुभदा शिंदे, युवा सेना विभागअधिकारी धनश्री कोलगे, युवासेना विस्तारक दिक्षा कारकर विभागातील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :मुंबईकिरीट सोमय्याशिवसेना