लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीएमसी बँक आणि पत्राचाळ प्रकरणातील राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून किरीट सोमय्या यांनी पैसे उकळले आहेत. वाधवान विरोधात सोमय्यांनी आरोपांची, तक्रारींची मालिका चालविली होती. पण, २०१६ मध्ये अचानक वाधवान यांच्या विरोधातील तक्रारी थांबल्या आणि त्याच वर्षी नील सोमय्या भागीदार बनले. सिरियल किलर वगैरे असतात तसे सोमय्या हे सिरियल कम्प्लेनर आहेत. पण, ज्या वाधवानवर आरोप केले त्याच्याशी भागीदारी कशी या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, अशा शब्दात शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी भाजप नेते सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी वाधवान आणि सोमय्यांच्या संबंधांच्या तारखा मांडल्या. सोमय्या यांनी जून २०१५ मध्ये एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या.
ऑक्टोबर २०१५ मध्ये सोमय्या यांनी एमएमआरडीएला पत्र लिहिले होते. यामध्ये एचडीआएल कंपनीला १ कोटी चौरस फूट व्यावसायिक जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचा आरोप केला होता. या जमिनीची किंमत ५००० कोटी रुपये असल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर सातत्याने एकापाठोपाठ एक तक्रारी करत होते. मात्र, त्यावेळी खासदार असलेल्या सोमय्या यांनी या सगळ्याविरोधात एकदाही केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली नाही, असेही राऊत म्हणाले.
अचानक दिवाण हाऊसिंगकडून नवलानीच्या खात्यात २५ कोटी आलेnजितेंद्र नवलानींच्या सात कंपन्यांमध्ये जमा झालेल्या पैशांची जंत्रीच राऊत यांनी यावेळी मांडली. २०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. nअचानक दिवाण हाऊसिंगकडून नवलानीच्या खात्यात २५ कोटी जमा करण्यात आले. मग २१ मार्च २०२० पर्यंत एसआर वाधवान यांच्या कंपनीकडून नवलानींच्या कंपनीमध्ये आणखी १५ कोटी रुपये जमा करण्यात आले. याचप्रकारे अविनाश भोसलेंची चौकशी झाली. nत्यानंतर भोसलेंकडून १० कोटी रुपये नवलानीच्या सात कंपनीमध्ये जमा झाले. युनायटेड फाॅस्फरस कंपनीची चौकशी सुरू झाली आणि पुढे नवलानी यांच्या खात्यात १६ कोटी जमा झाले. nअशाच पद्धतीने गेलाॅर्ड कंपनीकडून दहा कोटी तर फायर सिक्युरिटीज कंपनीकडूनही १५ कोटी जमा झाल्याची माहिती राऊत यांनी दिली.