Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:20 PM2022-02-25T12:20:38+5:302022-02-25T12:30:54+5:30

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय. 

Kirit Somaiya: Kirit Somaiya announces list of Dirty Dozens, will these 12 leaders get stuck? | Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी जाहीर केली 'डर्टी डझन'ची लिस्ट, हे 12 नेते अडकणार?

googlenewsNext

मुंबई - राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तर, विधानभवनातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे भाजपा नेते मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर, किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय. 

लडेंगे और जितेंगे, डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना म्हटलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे सर्वच नेते त्यांच्या पाठिशी उभे असल्याचं दिसून आले. तर, भाजप नेते मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी लगेच ट्विट केलं. त्यामध्ये किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब असं, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. आता, सोमय्यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझन म्हणून 12 नावांची यादीच जाहीर केली आहे. 


सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन' नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्लीत विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. 

सोमय्यांनी जाहीर केलेली 12 नावे -

1. अनिल परब
2. संजय राऊत
3. सुजित पाटकर
4. भावना गवळी 
5. आनंद आडसुळ
6. अजित पवार
७. हसन मुश्रीफ
8. प्रताप सरनाईक
9. रविंद्र वायकर
10. जितेंद्र आव्हाड 
11. अनिल देशमुख
12. नवाब मलिक 


 

Web Title: Kirit Somaiya: Kirit Somaiya announces list of Dirty Dozens, will these 12 leaders get stuck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.