नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:42 PM2022-12-31T12:42:25+5:302022-12-31T12:58:19+5:30
उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय वर्तुळातुनही शुभेच्छा, तसेच नवीन वर्षाचे स्वागत सुरू आहे.
मुंबई- उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय वर्तुळातुनही शुभेच्छा, तसेच नवीन वर्षाचे स्वागत सुरू आहे. या पार्श्वभूमिवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन विरोधकांना इशारा दिला आहे. या व्हिडिओत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार अनिल परब, आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार अस्लम शेख,किशोरी पेडणेकर या नेत्यांचा उल्लेख करत इशारा दिला आहे.
'उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे, मी या नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब चुकता करणार आहे. ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, किशोरी पडेणेकर मुंबई महापालिकेचा हिशोब पूर्ण करणार असल्याचा सूचक इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज 'धर्मवीर' नव्हते, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार अनिल परब यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
ठाकरे परिवाराचे १९ बंगले
अनिल परब
हसन मुश्रीफ
असलम खान चे स्टुडिओ
किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
मुंबई महापालिका
यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/DLR2ie7z1g
दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी ट्विट केले होते, या ट्विट मध्ये त्यांनी मी १ जानेवारीला रेवदंडा पोलीस ठाण्यात ठाकरे आणि वायकर यांचा कोलई अलिबागचा १९ बंगला घोटाळ्याविरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.