Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत प्रकरणात पोलिसांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 10:42 PM2022-04-08T22:42:25+5:302022-04-08T22:47:41+5:30

Kirit Somaiya: ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पित्रा-पुत्रांना 9 एप्रिलला सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Kirit Somiaya: Mumbai Police summons former BJP MP Kirit Somaiya & his son to appear before Trombay Police Station in INS Vikrant case | Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत प्रकरणात पोलिसांनी बजावली नोटीस

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, INS विक्रांत प्रकरणात पोलिसांनी बजावली नोटीस

Next

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद रंगला आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जनतेकडून कोट्यवधी जमा केले आणि हे पैसे स्वत:साठी वापरले असा गंभीर आरोप करत राऊतांनी राज्यपाल कार्यालयाकडून आलेले पत्र दाखवलं. त्यानंतर किरीट सोमय्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

आता मुंबई पोलिसांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांना नोटीस पाठवली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पित्रा-पुत्रांना नोटीस पाठवून त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 9 एप्रिल 2022 ला सकाळी 11 वाजता ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी सोमय्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी काय आरोप केले?
किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचे काय झाले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. त्या निधीचे काय झाले, याचं उत्तर लोकांना मिळायला हवे. सध्या भाजपचे कार्यालय झालेल्या राजभवनाने आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचे म्हटले आहे. त्याची कागदपत्रे माझ्याजवळ आहेत. या विक्रांत फाईल्स काश्मीर फाईल्सपेक्षा गंभीर आहेत, असे राऊत म्हणाले. तसेच, सोमय्यांनी 58 कोटी रुपये लाटल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

केवळ 35 मिनिटे निधी गोळा केला- सोमय्या
आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटेच निधी गोळा केल्याचे स्पष्टीकरण सोमय्यांनी दिले आहे. विक्रांतसाठी 10 डिसेंबर 213 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. 35 मिनिटे मी निधी गोळा केला, जेमतेम 10 लोकांनी डब्यात पैसे टाकले. अवघ्या 35 मिनिटांत इतका निधी कसा काय गोळा होऊ शकतो. काँग्रेसनंदेखील भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यातून त्यांनी किती पैसे गोळा केले, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Kirit Somiaya: Mumbai Police summons former BJP MP Kirit Somaiya & his son to appear before Trombay Police Station in INS Vikrant case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.