Join us

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 02:14 IST

एकमताने निवड : संमेलन जूनमध्ये मुंबईत

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या, ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांची एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, या उत्सुकतेवर पडदा पडला आहे. गुरुवारी (दि. १९) झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी व नियामक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे संगीत रंगभूमीचा गौरव झाल्याची भावना नाट्यसृष्टीमध्ये आहे.कीर्ती शिलेदार यांच्यासह श्रीनिवास भणगे व सुरेश साखवळकर यांचे अर्ज नाट्य परिषदेकडे या पदासाठी आले होते. या सर्वांच्या नावावर बैठकीत चर्चा होऊन आगामी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, ९८वे नाट्य संमेलन मुंबईत घेण्यात येणार असून, ते शक्यतो १३ ते १५ जून २०१८ या कालावधीत होणार असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मराठी