Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 12:07 PM2018-03-12T12:07:25+5:302018-03-12T12:07:25+5:30

अखिल भारतीय किसान सभेतर्फे 6 मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला.

Kisan Long March: Mumbaikar appealed to the support the farmers through social media | Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन

Kisan Long March : मुंबईकर मायबाप शेतकऱ्यांच्या पाठिशी, सोशल मीडियावरून अन्नदात्याचं  मदतीचं आवाहन

googlenewsNext

मुंबई -  अखिल भारतीय किसान सभेतर्फे 6 मार्चपासून काढण्यात आलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च रविवारी मुंबईत दाखल झाला. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपाहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पाहायला मिळाले. सहा दिवस अहोरात्र उन्हात चालूनदेखील शेतकरी प्रचंड उत्साही दिसले.  

दरम्यान, काही अन्नदात्यांनी सोशल मीडियावरही नागरिकांना मदतीचं आवाहन केले आहे. विजय लाड यांनीही व्हॉट्सअॅपवर शेतक-यांना अन्न-पाण्याची मदत करण्याचं आवाहन केले आहे.''आपले मुबंईतील पाहुणे, मित्र ,ओळखीचे यांना विनंती करा-महाराष्ट्रचा पोशिंदा बळीराजा 166 किलोमीटरचे अंतर तुडवून मुंबईत दाखल झाला आहे. नोकरीला,कामाला निघताना एक पाण्याची बॉटल आणि जमल्यास एक जेवणाचा डबा सोबत ठेवावा. मायबाप शेतकरी, आदिवासी पायी  चालत मुंबईत येत आहेत. त्यांना अन्न व पाण्याची गरज भासल्यास आपल्याकडील जास्तीचा डबा व पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. हे सर्व दया म्हणून नव्हे तर त्या अन्नदात्याप्रती आपले कर्तव्य म्हणून पार पाडा. हे जगले तर आपण जगू !  सामील व्हा #लाँगमार्च #आक्रोश_बळीराजाचा.. असं आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे. 

तर दुसरीकडे, मोर्चाला मदत करणा-या विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, आजोबा, मामा गावाकडे शेती करतात. मुंबईत मिळणारा भाजीपाला, धान्य, कडधान्यांपासून ते साखर, तेलापर्यंत सर्व वस्तू शेतकºयांच्या कष्टामुळे आपल्याला मिळतात. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकºयांमध्ये बहुतांश शेतकरी हे वयोवृद्ध आहेत.

संत बाबा ठाकरसिंगजी कास सेवा विक्रोळी (विक्रोळी गुरुद्वारा) तर्फे आंदोलकांसाठी नाश्ता, पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दी बॉम्बे कॅथलिस सभेतर्फे विक्रोळी येथे आंदोलकांसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.
 

Web Title: Kisan Long March: Mumbaikar appealed to the support the farmers through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.