छोट्या स्थानकांवरील थांब्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांसाठी किसान रेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:00+5:302020-12-16T04:25:00+5:30

मुंबई : ‘किसान रेल्वे गाड्या’ ताजा भाजीपाला आणि फळांची देशाच्या विविध भागांत वाहतूक करीत आहेत. छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने ...

Kisan Rail boon for small farmers due to stops at small stations | छोट्या स्थानकांवरील थांब्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांसाठी किसान रेल वरदान

छोट्या स्थानकांवरील थांब्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांसाठी किसान रेल वरदान

Next

मुंबई : ‘किसान रेल्वे गाड्या’ ताजा भाजीपाला आणि फळांची देशाच्या विविध भागांत वाहतूक करीत आहेत. छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळविता येतो. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे जीवनमानच बदलले नाही, तर छोट्या रेल्वे स्थानकांना शेती उत्पादनांच्या मोठ्या लोडिंग हबमध्ये बदलले आहे.

यापूर्वी सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, बेलापूर आणि मोडलिंब यांसारख्या गुड्स किंवा पार्सल वाहतूक नसलेल्या स्थानकांवर सांगोला - मुझफ्फरपूर किसान रेलगाडीला आणि बंगळुरू - आदर्श नगर दिल्ली किसान रेलला सांगोला व जेऊरसारख्या लहान लहान स्थानकांवर थांबे देण्यात आले. या प्रदेशातील छोट्या शेतकऱ्यांचा विचार करता या स्थानकांवरील थांब्यांमुळे डाळिंब, पेरू, सीताफळे, केळी आणि इतर फळे, भाजीपाला तसेच मासे भारतातील विविध ठिकाणी वाहतुकीसाठी जाता येण्यासारख्या शेतकरऱ्यांच्या नाशवंत शेती उत्पादनांना मदत केली. सोलापूर विभागातील या छोट्या स्थानकांवर किसान रेल्वेत त्यांची शेतातील उत्पादने भरल्यामुळे या प्रदेशातील स्थानकांतील शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे.

सांगोला, एक लहान स्टेशन जे ३ किसान रेल्वेचे मोठे लोडिंग पॉईंट आहे, ऑगस्ट २०२० मध्ये किसान रेल सुरू झाल्यापासून येथे आतापर्यंत एकूण ८,३२५ टन फळांची वाहतूक झाली आहे. सांगोला - मुझफ्फरपूर किसान रेल्वे सुरू झाल्यापासून इतर लहान स्थानकांवर शेती उत्पादनांची लोडिंग अशी- बेलवंडी १७५ टन, कोपरगाव ३३६ टन आणि बेलापूर १६५ टन.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जेऊर हे एक छोटेसे स्टेशन आहे. यापूर्वी या स्थानकातून कोणतीही पार्सल लोडिंग सेवा नव्हती, परंतु बेंगळुरू - आदर्श नगर, दिल्ली किसान रेल्वे सुरू झाल्याने या स्थानकाच्या आसपास असणाऱ्या संघर्षशील शेतकऱ्यांना उत्तम संधी मिळाली. किसान रेलच्या ६ फेऱ्यांमध्ये, जेऊरमधून ५७८ टन फळे भरली. या भागातील बरेच शेतकरी जेऊर येथे किसान रेलच्या आगमनाने अत्यंत आनंदित आणि उत्साहित आहेत.

Web Title: Kisan Rail boon for small farmers due to stops at small stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.