ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:42 AM2023-11-09T11:42:11+5:302023-11-09T11:42:46+5:30
चौकशीला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दांडी मारली.
मुंबई :
कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने बोलावलेल्या चौकशीला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी दांडी मारली. त्याऐवजी त्यांनी आपल्या वकिलाला ईडीच्या कार्यालयात पाठवले होते व या प्रकरणाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपल्याला चार आठवड्यांचा कालावधी हवा असल्याची मागणी केली आहे.
किशोरी पेडणेकर यांना पुढील आठवड्यात नव्याने समन्स जारी करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी मंगळवारी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलारसू यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने बॉडी बॅग्जची खरेदी वाढीव दराने केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे ईडी तपास करत आहे.