किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:49 AM2022-11-02T06:49:36+5:302022-11-02T06:52:14+5:30

यादरम्यान त्यांच्याकडे काही कागदपत्रांची देखील मागणी करण्यात आल्याचे समजते.

Kishori Pednekar's two-and-a-half-hour inquiry; Investigation started in SRA scam case | किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू

किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू

Next

मुंबई :  दादरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये (एसआरए) स्वत:त फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नऊ जणांची सव्वा कोटींना फसवणूक केल्याच्या प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांनी मंगळवारी अडीच तास चाैकशी केली. पोलिसांनीकिशोरी पेडणेकर यांचा जबाब नोंदवून घेतला असून, आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा चाैकशीला बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले. 

एसआरए प्रकल्पातील फ्लॅट ३२ लाख रुपयांत नावावर करून देण्याचे आमिष दाखवून ९ जणांकडून ०१ कोटी ३५ लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी जून महिन्यात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींची चाैकशी आणि मोबाईलमधील चॅटमधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे. 

यादरम्यान त्यांच्याकडे काही कागदपत्रांची देखील मागणी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, या दाखल गुन्ह्यासह किशोरी पेडणेकर यांच्यावर आणखी काही गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत.  त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या शुक्रवारी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर झाल्या. सायंकाळ झाल्याने १५ ते २० मिनिटे चाैकशी करुन त्यांना शनिवारी सकाळी चाैकशीला बोलवण्यात आले.  मात्र त्या गैरहजर राहिल्या. अखेर मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या. गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सुमारे अडीच तास कसून चाैकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला. दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या.

Web Title: Kishori Pednekar's two-and-a-half-hour inquiry; Investigation started in SRA scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.