वडाळ््यात रंगला पतंग महोत्सव
By admin | Published: January 11, 2016 02:21 AM2016-01-11T02:21:07+5:302016-01-11T02:21:07+5:30
ढिल दे ,ढिल दे... काय पो चे!’ असे म्हणत पतंग उडवण्याचा सण अर्थात मकरसंक्रात अगदी काही दिवसांवर आली असताना, वडाळा येथील भक्ती पार्कमध्ये रविवारी
मुंबई: ‘ढिल दे ,ढिल दे... काय पो चे!’ असे म्हणत पतंग उडवण्याचा सण अर्थात मकरसंक्रात अगदी काही दिवसांवर आली असताना, वडाळा येथील भक्ती पार्कमध्ये रविवारी पतंग महोत्सव रंगला. भारतीय आणि चिनी बनावटीच्या पतंगांनी आकाशात उंचच उंच भराऱ्या घेतल्या आणि सगळ््यांनीच पतंग महोत्सवाचा यथेच्छ आनंद लुटला.
मोबाइल फोन आणि सोशल मीडियाच्या जाळ््यात अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांपासून बालपणी अनेकदा पेच लढवलेल्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांनीच या पारंपरिक खेळात भाग घेतला. महोत्सवात पतंग बनविण्याची आणि सजवण्याची स्पर्धा झाली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मुलांनी स्वत: बनवलेले पतंग हवेत उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी चिनी बनावटीच्या पतंगांनाही अनेकांना आकर्षून घेतले. कापडापासून तयार केलेले स्पायडरमॅन, बी, इगल या बरोबरच विविध कार्टुन कॅरॅक्टर असलेले पतंग यावेळी उडवण्यात आले. शिवाय पक्ष्यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना इजा होणार नाही, असा खास मांजा वापरण्यात आला होता. पतंगबाजीव्यतिरिक्त मुलांना आवडणाऱ्या इतर अनेक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचाही आनंद सगळ्यांनीच लुटला. एरव्ही सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी पोझेझ देणारे तरुण पतंग उडवण्यात गुंगून गेले होते. पतंगाची कापाकापी करण्यासाठीही अनेकांची धडपड सुरू होती.