भेसळ केलेले पनीर कसे ओळखाल? सोपी पद्धत जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:55 PM2023-08-18T12:55:10+5:302023-08-18T12:56:30+5:30
पनीरच्या भेसळीबाबत सर्वसामान्यांनी तक्रार केली तर अन्न औषध प्रशासन त्याविरोधात कारवाई करते.
मुंबई : दुधातील सत्त्व काढून घेऊन पनीरमध्ये भेसळ केली जाते. अशा भेसळयुक्त पनीरची किरकोळ बाजारात विक्री सुरू असते. त्याविरोधात अन्न औषध प्रशासन विभाग कारवाई करीत असले तरी पनीरची भेसळ सर्वसामान्यांनाही ओळखता आली पाहिजे. भेसळयुक्त पनीरची उपनगरांत विक्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बदलापूर आणि भिवंडीमध्ये दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपन्यांचा पर्दाफाश केला होता. हे भेसळयुक्त पनीर उपनगरांत विकले गेले होते. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले होते.
पनीरमधील भेसळ कशी ओळखाल?
बनावट पनीर बनविण्यासाठी मुख्यत्वे दुधाचा वापर केला जातो. मात्र, दुधातील पोषक तत्त्वे काढून झटपट श्रीमंती मिळविण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जाते. दुधातील फॅट काढून, त्याची पावडर बनवितात. त्यानंतर ती पावडर पाण्यात मिसळून पांढरे पाणी तयार करतात. मात्र, या पाण्यात फॅट नसल्याने पनीर तयार होऊ शकत नाही. त्यासाठी या पाण्यात खाद्यतेल मिसळतात. खाद्यतेलातील फॅट यामध्ये टाकून तसेच एमएलसी फायर हा वैज्ञानिक प्रयोग करून बनावट पनीर तयार केले जाते. हे पनीर आरोग्यास घातक असते.
भेसळ केली तर काय होणार कारवाई?
पनीरच्या भेसळीबाबत सर्वसामान्यांनी तक्रार केली तर अन्न औषध प्रशासन त्याविरोधात कारवाई करते. कारवाईत दुकानातील सर्व साठा ताब्यात घेतला जातो. दोषीचा परवाना रद्द होऊन कठोर कारवाई करण्यात येते.
कुठे तक्रार कराल?
पनीर खरेदी करताना संशयास्पद आढळल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयात ई-मेलद्वारे किंवा हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रार करू शकता. दुधातील फॅट काढून, त्याची पावडर बनवितात. त्यानंतर ती पावडर पाण्यात मिसळून पांढरे पाणी तयार करतात. मात्र, या पाण्यात फॅट नसल्याने पनीर तयार होऊ शकत नाही.