Join us

उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 2:08 PM

मध्य रेल्वे - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी, या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

 मुंबई :  विविध देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर  रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर काेणताही ब्लॉक असणार नाही. 

पश्चिम रेल्वेचा नाइट ब्लॉक --  मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मुख्य़ मार्गावरील प्लॅटफॉर्मवर रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. -  रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत तीन तास दुरुस्ती करण्यात येणार आहे. -  ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. -  काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रविवार, ७ डिसेंबर रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे -कुठे? - माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर. कधी? -  सकाळी ११:३० ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत. परिणाम - ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी, या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे -कुठे? - पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर. कधी? - सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत. परिणाम - ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते नेरूळदरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशीदरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते ठाणे - नेरूळदरम्यान लोकल सेवा सुरू राहणार आहे. 

टॅग्स :लोकलरेल्वेपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे