नेरळच्या सरपंचपदी कोकाटे

By admin | Published: December 5, 2014 11:03 PM2014-12-05T23:03:02+5:302014-12-05T23:03:02+5:30

कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नेरळ ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने पुन्हा ताब्यात ठेवली आहे.

Kokate of Kerala's Sarpanch | नेरळच्या सरपंचपदी कोकाटे

नेरळच्या सरपंचपदी कोकाटे

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नेरळ ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने पुन्हा ताब्यात ठेवली आहे. सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री राजेश कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंच म्हणून केतन पोतदार यांची निवड झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. ही परंपरा राष्ट्रवादीने मोडीत काढली. मात्र दोन सदस्य असलेल्या शिवशाही आघाडीने उपसरपंच पटकावून चमत्कार घडविला आहे. २३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शुक्रवारी पीठासीन अधिकारी नालंद गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. मागास प्रवर्ग महिला राखीव सरपंचपदासाठी प्रभाग चारमधून राजश्री राजेश कोकाटे यांचा एकमेव तर उपसरपंचपदासाठी शेकापचे नितेश शाह आणि शिवशाही आघाडीचे केतन पोतदार यांनी अर्ज केला होता. (वार्ताहर)

Web Title: Kokate of Kerala's Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.