मुंबई : वर्सोव्यातील चार बंगला येथील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा दशकपूर्ती सोहळा नुकताच मुंबईत साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्यात या सर्व मान्यवरांनी हॉस्पिटलसंदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या हॉस्पिटलच्या १० वर्षांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी ‘लोकमत’ मीडिया ग्रूपचे समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी आपल्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ बच्चन यांनी या नामांकित हॉस्पिटलचे काही पैलू उलगडले. अनील अंबानी आणि टीना अंबानी यांनी येथे उत्तम सुविधा केल्या आहेत. जेव्हा रुग्ण येथे उपचारासाठी येतात तेव्हा त्यांना आम्ही योग्य ठिकाणी आल्याची त्यांना खात्री होते. जेव्हा मी आजारी होतो तेव्हा अनिल अंबानी यांनी मला धीर दिला होता. या हॉस्पिटलच्या मुहर्तमेढीचा एक खास किस्सा सांगताना अनिल अंबानी म्हणाले की, ठिकाणी हॉस्पिटल बांधण्याची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आज ७४७ बेडचे सुपरस्पेशालिटी कोकीलाबेन हॉस्पिटल उभे राहिले आहे. आणि याचा लाभ अनेक गरजू रूग्णांना मिळत आहे. याचा मला आनंद वाटत आहे. या कार्यक्रमाला कोकिलाबेन अंबानी, टीना अंबानी, डॉ.अलका मांडके, गोदरेज समूहाचे आदि गोदरेज, जया बच्चन आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचा रंगला दशकपूर्ती सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 2:41 AM