कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:02 PM2023-03-10T20:02:11+5:302023-03-10T20:02:20+5:30

छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात आलेल्या सिनेमांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते हे अनुदान आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे.

Kolhapur Chitranagari will be transformed; Minister Sudhir Mungantiwar's information in the Legislative Assembly | कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती

googlenewsNext

मुंबई: कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच सिनेमा चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य रोहित पवार, हरीभाऊ बागडे, हसन मुश्रीफ, दिपक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययातव सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
 
सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, येत्या काळात कोल्हापूरात 78 एकर परिसरात असलेली चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना येथे येणाऱ्या पर्यटकांना उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पाहून पण मनोरंजन होईल. सध्या मोठया प्रमाणावर येथे आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत असल्याने चित्रपटसृष्टीला रोजगार आणि महसूल निर्माण होण्यास मदत होत आहे.
 
कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक 18 जानेवारी 2023 रेाजी घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरीत रेल्वे स्थानकाचा तसेच रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहर आणि एका बाजूस गाव वस्तीचा देखावा तयार करणे, कोल्हापूर चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करणे, कोल्हापूर चित्रनगरी येथे रस्ते तयार करण्याबरोबरच पथदिवे बसविणे, तसेच येथील संपूर्ण परिसरात पाणी पुरवठयासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 4 ते चित्रनगरीपर्यंत 100 मि.मि. व्यासाची जलवाहिनी टाकणे आणि पाण्याची टाकी बांधणे, टॉकशो स्टुडिओकरिता ध्वनी प्रतिबंध आणि अग्निशमन योजना करणे, येथे सोलर यंत्रणा बसविणे असे निर्णय घेण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.  
 
छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर बनविण्यात आलेल्या सिनेमांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते हे अनुदान आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच मालिका आणि सिनेमा यांनाही हे देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म चांगले कन्टेंट यावे यासाठी 5 तज्ञ लोकांची समिती नुकतीच करण्यात आली आहे. याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट बनविणाऱ्यांना राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला असून 41 मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात आल्याचे  मुनगंटीवार यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur Chitranagari will be transformed; Minister Sudhir Mungantiwar's information in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.