Join us

कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन; अस्तित्व अन् अस्मितेचे प्रतिकात्मक केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 6:07 PM

मुंबादेवीचा जयघोष करत मुंबईच्या आद्य कोळी जमातीने मुंबदेवीचे सामूहिक दर्शन घेतले.

मुंबई- परप्रांतिय व्यनस्थापनाच्या घशात गेलेले  मुंबादेवी मंदिर कोळी समजाच्या ताब्यात द्यावे हि मागणी करणाऱ्या  कोळी महासंघाने आयोजित केलेले मुंबादेवी मातेचे कल सामूहिक दर्शन आंदोलन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा विधान परिषद आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जयघोषात यशस्वी केले. 

मुंबादेवीचा जयघोष करत मुंबईच्या आद्य कोळी जमातीने मुंबदेवीचे सामूहिक दर्शन घेतले. मुंबईतील कोळी समाजाचे अस्तित्व आणि मंदिर मुक्तीची चळवळ कोळी महासंघ, मुंबई विभागाने आयोजित केली होती. यावेळी राजहंस टपके, अँड.सचिन ठाणेकर, बहुजन वंचित नेते राजाराम पाटील, नगरसेविका रजनी केणी, शाहिर चिंतामणी शिवडीकर, रोहिदास कोळी, भगवान भानजी,अँड. कमलाकर कांदेकर, अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष केदार लकेपोरिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई नगरीचे नाव ज्या मुंबादेवीमुळे  मिळाले त्या मुंबादेवीच्या मंदिराशी कोळी समाजाचे सांस्कृतीक नाते असूनही यावर परप्रांतियांचा ताबा आहे. जी गत मुंबादेवी मंदिराची तिच गत मुंबईतील कोळीवाड्याच्या जमिनी,खाड्या खाजणे, पारंपारिक मासेमारी, कोळी महिलांची मासेविक्रीची झाली आहे. मुंबई तुमची पण भांडी घासा आमची, हि उपेक्षा मुंबईच्या कोळी लोकानी जवळ जवळ स्विकारल्या सारखीच आहे . आणि हि उपेक्षित मानसिकता, मरगळता झटकून मुंबईचा आद्य रहिवासी असलेल्या कोळी समाजाला जागृत करण्याची शक्ती  मुंबादेवीच्या प्रतिकात्मक आंदोलनात आहे असे राजहंस टपके म्हणाले.

मंदिरा प्रमाणेच  परक्यांच्या घशात गेलेले मुंबईतील कोळीवाडे, वंशपरंपरागत घरे, खाड्या खाजणे, मासेमारी बंदरे,  मासेविक्री बाजार देखिल  परत मिळविण्याचे आंदोलन ठरावे . कोळीवाड्यांचे सिंमाकन व्हावे. कोळीवाड्यातील वंशपरपरागत घरे बांधणे, विकसित करणे याकरिता स्वतंत्र कायदे व्हावेत. परक्यानी बळजबरिने अधिक्रमित केलेल्या जमिनी मुक्त करण्यात याव्यात. खाड्या खाजणांवर असलेला नैर्सगिक हक्क मान्य करावा .पारंपारिक मासेमारी आणि मासेविक्री मध्ये घुसलेल्या परकियाना प्रतिबंध करावा . या आणि अश्या मागण्याचे आंदोलन पुर्ण मुंबईत उभे करण्याची क्षमता या आंदोलनात आहे .गरज आहे ति हे आंदोलन प्रामाणिक आणि जिगरबाज पणे पुढे नेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची आणि आद्य कोळी जमातीचे मुंबईतील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या परिपक्वतेची गरज आहे असे ठाम मत  टपके यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मंदिरमुंबई