मुंबईतील कोळी समाज विस्थापनाला हवी पुनर्वसनाची साथ, कोळी समाजाने घातले घातले मुंबादेवीला साकड
By मनोहर कुंभेजकर | Published: October 2, 2022 06:20 PM2022-10-02T18:20:37+5:302022-10-02T18:20:49+5:30
मुंबईतील आद्य देवस्थान असलेले आई मुंबादेवी देवस्थानावर कोळी जमात पूर्वापार दावा करीत आला आहे
मुंबईतील आद्य देवस्थान असलेले आई मुंबादेवी देवस्थानावर कोळी जमात पूर्वापार दावा करीत आला आहे, त्या मंदिराचे व्यवस्थापन आजही परप्रांतीयांच्या हाती आहे. मागील नऊ वर्षांपासून कोळी समाज सातत्याने नवरात्री उत्सवामध्ये सामूहिक दर्शन सोहळा आयोजित करून आपला वहिवाट हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित केले.
कोळी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी समाजाच्या सामूहिक दर्शन सोहळ्यात मुंबई ठाणे येथील निरनिराळ्या कोळीवाड्यातून बांधव मानवी कोळीवाड्यात जमले होते. मांडवी कोळीवाडा येथून समस्त कोळी समाज आपल्या पारंपारिक वेशभूषेध नाचत गाजर मिरवणुकीने श्री मुंबादेवी आईच्या दर्शनाला निघाला, यावेळी वरळी कोळीवाड्यातुन आलेल्या बँडच्या तालावर आणि आई मुंबादेवीच्या जय घोषणेवर सगळ्यांनी टाळ धरला होता.
मुंबई महानगरीच्या विकासाचा विपरीत परिणाम कोळी समाजाच्या उपजीविकेच्या नैसर्गिक साधन सामग्रीवर, ती नष्ट करण्यावर झाली असून त्यामुळे कोळी समाजाच्या जीवन जगण्याच्या हक्काचं, गावठाणांच्या आणि कोळीवाड्यांच्या सीमांकनातून तो पार जात असल्याने कोळी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या महानगरीचा झालेला विकास हा विकास प्रकल्प म्हणून गृहीत धरून कोळी समाजाचे विस्थापन झाले आहे, या विकासाचा विपरीत परिणाम कोळी समाजावर झालेला आहे. या मुंबईतील आद्य कोळी जमातीचे विस्थापन झालेले आहे. हे विस्थापन मान्य करून कोळी समाजाचे पुनर्वसन व्हावे असं साकडं मुंबादेवीला, हजारो समाज बांधवांनी घातल आहे.
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधानपरिषद आमदार रमेश पाटील,कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके,अँड. चेतन पाटील, अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केदार लखेपुरिया, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन चे कार्याध्यक्ष विकास कोळी, कोळी महिला भगिनींच्या नेत्या राजश्री भानजी, रोहिदास कोळी, माजी नगरसेविका रजनी केणी, सुनिता माहुलकर, कल्पना सातरंगे, प्रतिभा वैती पाध्ये, समाज इतिहास अभ्यासक भगवान भानजी, अखिल भारतीय सांस्कृतिक संवर्धन मंडळाचे प्रा. भावेश वैती, मोहित रामले, शाहीर चिंतामणी शिवडीकर, परंपरा वेसावची मंडळीचे नृत्य दिग्दर्शक राजेश खर्डे, सागर शक्ती चे व्यवस्थापक घनश्याम पाटील, कोळी गीतांचे समीक्षक भगवान दांडेकर, रायगड जिल्हा कोळी महासंघाचे उपाध्यक्ष विलास कोळी आणि निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.