Join us

वेसावेत कोळी महोत्सव सुरू

By admin | Published: January 23, 2017 6:01 AM

वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिरच्या मैदानावर तीनदिवसीय वेसावा कोळी महोत्सवाला शनिवार

मुंबई : वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिरच्या मैदानावर तीनदिवसीय वेसावा कोळी महोत्सवाला शनिवार २१ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, अंबरनाथ येथील २० हजार नागरिकांनी महोत्सवाला भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. महोत्सवाचे यजमानपद यंदा वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे असून, वेसावा कोळी सर्वोदय सहकारी सोसायटी, वेसावा कोळी मच्छीमार नाखवा मंडळ, ट्रॉलर, वेसावा कोळी जमात ट्रस्ट, वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी यांचे त्यांना सहाय्य आहे. महोत्सवाचे उद्घाटन रामेश्वर इन्फ्रास्ट्रक्चरचे मोहनराव पिंपळे यांच्या उपस्थितीत झाले असून, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, आमदार भारती लव्हेकर, उपाध्यक्ष जयराज चंदी, खजिनदार देवेंद्र काळे आणि सहसचिव जगदीश भिकरू आदी या वेळी उपस्थित होते, असे महोत्सवाचे स्वागताध्यक्ष नारायण कोळी आणि सचिव महेंद्र लडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)