Join us

क्रॉफर्ड मार्केटमधून स्थलांतराची नोटीस देण्यात आल्याने मच्छिमार महिलांची राज ठाकरेंकडे धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 3:24 PM

क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मुंबई - क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाला मासेविक्री करणाऱ्या मच्छीमार कोळी समाजाकडून तीव्र विरोध होत असून, या संदर्भात मच्छिमार समाजातील महिलांनी आज कृष्णकुंज येथे धाव घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणी आपण मुंबई महानरपालिका आयुक्तांची भेट घेऊ असे आश्वासन राज ठाकरे यांनी या महिलांना दिले.  मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेने ३१ जुलैपर्यंतची गाळे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर ६०० महिला गाळेधारक आणि ४०० होलसेल विक्रेत्यांचा उदरनिर्वाह अबलंबून आहे.  यासंदर्भात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीतर्फे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, १ जुलै रोजी महापालिकेच्या बाजार समितीतर्फे मंडई बंद करण्याटी नोटीस देण्यात आली. सर्व किरकोळ मासळी विक्रेत्या महिलांनी नोटिसीचा निषेध करत, मंडई सोडून कोणत्याही अन्य ठिकाणी जाण्यास विरोध दर्शविला आहे. नोटीसमधील विषयात ‘तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत’ असे नमूद करून मूळ नोटीसमध्ये ‘कायमस्वरूपी जागा मिळण्यास स्थलांतरित’ असा शब्दप्रयोग केला आहे, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला.  

टॅग्स :राज ठाकरेमुंबईमुंबई महानगरपालिकामच्छीमार