कोळगावकर, बेंडखळे यांना पुरस्कार जाहीर

By admin | Published: May 4, 2017 06:35 AM2017-05-04T06:35:48+5:302017-05-04T06:35:48+5:30

सानेगुरुजी आरोग्य मंदिर सांताक्रुझ या शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी पद्य व गद्य विभागातील उत्कृष्ट बालसाहित्याला

Kollgaonkar, Bendkhale Award | कोळगावकर, बेंडखळे यांना पुरस्कार जाहीर

कोळगावकर, बेंडखळे यांना पुरस्कार जाहीर

Next

मुंबई : सानेगुरुजी आरोग्य मंदिर सांताक्रुझ या शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी पद्य व गद्य विभागातील उत्कृष्ट बालसाहित्याला ‘पार्वतीबाई आव्हाड स्मृती उत्कृष्ट बालवाङमय राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. २०१६ मधील पुस्तकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
बालसाहित्यातील पद्य विभागात उत्तम कोळगावकर ( नाशिक) यांच्या ‘मनात आहे पुष्कळ पुष्कळ’ या कुमार काव्यसंग्रहाची तर माया धुप्पड ( जळगाव) यांच्या ‘सावल्यांचे गाव’ या बालकाव्यसंग्रहाची, तसेच गद्य विभागात अशोक बेंडखळे (मुंबई) यांच्या ‘लक्ष्मीबाई टिळक’ या मुलांसाठी लिहिलेल्या चरित्रग्रंथाची निवड या वर्षीच्या पुरस्कारासाठी करण्यात आलेली आहे.
रोख रक्कम, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा हा बालवाङमय पुरस्कार आहे. या वर्षीचा हा पुरस्कार सोहळा सानेगुरुजी स्मृतिदिनी ११ जून २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता सानेगुरुजी आरोग्य मंदिराच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशांक अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
कार्यक्रमास संस्थेच्या मानद कार्यवाह स्नेहलता मळेकर उपस्थित असतील, तसेच सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ
आव्हाड कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kollgaonkar, Bendkhale Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.