कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात ?

By admin | Published: April 3, 2015 10:08 PM2015-04-03T22:08:44+5:302015-04-04T00:04:38+5:30

समस्या कोकण रेल्वेची

Konkan Railway headquarters in Goa? | कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात ?

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात ?

Next

रजनीकांत कदम - कुडाळ महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे बेलापूर येथील मुख्य कार्यालय, गोवा येथे नेण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच कोकण रेल्वेची सूत्रे गोवा राज्यातून हलवणार असून, राज्यातून तिकडे कार्यालय नेण्याच्या कोकण रेल्वे प्रशासनाबाबत कोकणातील लोकप्रतिनिधी मात्र काहीच बोलत नसून शांत का आहेत, हा प्रश्न कोकणवासीयांना पडला आहे. अनेक आव्हाने पेलून समर्थपणे सुरू झालेली कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा व केरळ या मुख्य तीन राज्यांतून जाते व ती इतर राज्यांना जोडली आहे. कोकण रेल्वेचा विस्तार पाहता सर्वांत जास्त विस्तार हा महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्रातील मुंबई बेलापूर येथे या कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून होते. मात्र, हल्ली काही कालावधीपासून हे कार्यालय गोवा राज्यात हलविण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
गोव्यामध्ये कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय व्हावे, अशी इच्छ गोवा सरकारची इच्छा होती. तशा प्रकारचा प्रस्तावही गोवा सरकारने शासनाकडे दिला होता. या प्रस्तावाचा आधार घेत कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रातून गोव्याकडे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे समजते. कोकण रेल्वेच्या कार्यालयाचा निम्मा विभाग मडगाव येथे नेण्यात येणार असून, कोकण रेल्वेचे
कंट्रोलिंग आता मडगाव येथूनहोणार आहे. महाराष्ट्राचा मोठा वाटाइतर राज्यांच्या तुलनेत कोकण रेल्वेमधील सर्वांत जास्त मोठा वाटा हा महाराष्ट्राचा असून, हे कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय हे महाराष्ट्रातच खऱ्या अर्थाने असणे गरजेचे आहे, असे असतानाही कोकण रेल्वे प्रशासन हे कार्यालय मुंबई येथे नेण्याचा का घाट घालीत आहे, हे मात्र समजत नाही. कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतून येणाऱ्या गाड्यांच्या इमर्जन्सी तिकिटांचा कोटाही आता गोव्यातूनच उपलब्ध होत आहे. राज्यातून सुरू झालेल्या कोकण रेल्वेबाबत योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात, चांगल्या प्रकारे प्रवाशांना सेवा देता यावी, याकरिता महाराष्ट्र शासनाने नेहमीच पुढाकार घेत आहे. मात्र, वेळोवेळी या प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यास नेहमी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन महाराष्ट्र शासनाला जुमानते की नाही, हा प्रश्न मात्र पडतो. एकतर तोट्यात चालणारी कोकण रेल्वे एकीकडे म्हणतो आणि आता रेल्वे प्रशासन मुंबईतील कार्यालय सोडून नवीन कार्यालय गोव्यात बांधावे लागणार. म्हणजे कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा खर्च मात्र निश्चित वाढणार, हे मात्र नक्की.

रेल्वेमंत्र्यांची भूमिका काय ?
कोकणचे सुपुत्र प्रा. मधु दंडवते हे केंद्रीय रेल्वेमंत्री झाल्यावर कोकणवासीयांसाठ स्वप्न नव्हे, सत्यातील कोकण रेल्वे प्रत्यक्ष आणली. मात्र, पुन्हा एकदा कोकणचे सुपुत्र व केंद्रीय रेल्वेमंत्री असणारे सुरेश प्रभू हे आता कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रातच ठेवण्याची भूमिका घेतात की कार्यालय गोव्यात नेण्यासाठी पुढाकार घेतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून आहे.

लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात
कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय गोवा राज्यात नेण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून, याबाबत कोकणातील सत्ताधारी असतील किंवा विरोधातील लोकप्रतिनिधी यांना याबाबत बहुधा काहीच माहिती नसावी, असे वाटते.
याबाबत कोणीही आपली भूमिका व्यक्त करीत नसल्याने सारेच सुशेगात असल्यासारखे वाटते. कोकण रेल्वेचे हे मुख्य कार्यालय गोव्यात नेण्याच्या भूमिकेबाबत कोकण रेल्वेचे प्रशासन, महाराष्ट्र शासन व येथील लोकप्रतिनिधींना जुमानणार की नाही, हे पाहणे आता गरजेचे आहे.
वाणिज्य, इंजिनियरिंग विभाग गेले गोव्याला
कोकण विभाग प्रशासनाचे मुख्य विभाग असणारे वाणिज्य व इंजिनियरिंंग विभाग जवळपास गोव्यामध्ये स्थलांतरित करण्यात आल्याचे समजत असून, वाणिज्य विभागाचे मुख्य प्रबंधक व इंजिनियरिंंगचे मुख्य अभियंता मडगाव येथून काम पाहत आहेत.

Web Title: Konkan Railway headquarters in Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.