मदत करणाऱ्या तरुणांसोबत कोरियन यूट्यूबर गेली लंच वर; व्हिडिओही शेअर केला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 07:54 PM2022-12-02T19:54:44+5:302022-12-02T19:55:39+5:30
मुंबईत एका दक्षिण कोरियन यूट्यूबर तरुणीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडली होती. यावेळी दोन तरुणांनी तिची मदत केली.
मुंबई: नुकतेच मुंबईत एका दक्षिण कोरियन यूट्यूबर तरुणीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडली होती. पार्क ह्यो जेओंग नावाची तरुणी यूट्यू लाइव्ह करत असताना हा प्रकार घडला होता. यादरम्यान, अथर्व तिखा नावाच्या एका तरुणाने त्या तरुणीची मदत केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर ही दक्षिण कोरियन तरुणी त्या तरुणासोबत लंचवर गेली. तिने स्वतः लंचचा व्हिडिओ आणि फोटो ट्विट केले आहेत.
Finally meeting with Indian heroes💜
— Mhyochi in 🇮🇳 (@mhyochi) December 2, 2022
Be my guess for the lunch today! pic.twitter.com/Um3lOeeciT
तरुणीने मानले आभार
गिरीश अल्वा नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये अथर्व तिखा कोरियन यूट्यूबरला सांगताना ऐकू येतोय की, त्याने तिचा लाइव्ह पाहिले आणि पटकन मदतीसाठी घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर तो दोन्ही आरोपींना महिलेचा विनयभंग करू नका असे सांगतो. यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून जातात. या संपूर्ण घटनेनंतर शुक्रवारी पार्कने एक व्हिडिओ ट्विट केला. यामध्ये तिने दोन्ही भारतीय व्यक्तींचे मदतीसाठी आभार मानले.
Lunch with two Indian gentlemen who help me to post the video and save me on the street👍
— Mhyochi in 🇮🇳 (@mhyochi) December 2, 2022
Aditya & Atharva pic.twitter.com/Cu9IYOjBMb
आरोपींना मुंबई पोलिसांनी केली अटक
या घटनेनंतर घाबरलेल्या तरूणीने रात्री ट्विट करून आरोपींवर कारवाईची मागणी केली. संबंधित तरूणीने मुंबई पोलिसांना मेन्शन करून ही बाब सर्वांसमोर आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबीन चंद मोहम्मद शेख वय 19 आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी वय 20 यांनी मुंबईत लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान एका कोरियन महिलेचा छळ केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र पीडित मुलीच्या वतीने ही तक्रार अधिकृतपणे नोंदवण्यात आलेली नाही.