मुंबई : राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून दक्षिण कोरियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व कोरिया लँड अँड हाउसिंग कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि कोरिया लँड अँड हाउसिंग कॉर्पोरेशनच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक ली की येओल यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.महाराष्ट्र हे विकसित राज्य असल्याने, जगातील अनेक देशांनी राज्यातील या विविध विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. त्याचबरोबर, या प्रकल्पांना सहकार्य करण्यासाठी अनेक देश स्वत:हून पुढे येत आहेत. कोरिया सरकारच्या सहकार्याने कोरिया लँड अँड हाउसिंग कॉपोर्रेशनने राज्यातील स्मार्ट सिटी, मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे वर उभारण्यात येणारी २४ हरित शहरे, वांद्रे शासकीय वसाहतीचा पुनर्विकास आणि राज्यातील रस्ते व पुलांचा विकास या प्रकल्पांना तंत्रज्ञान पुरविण्याचे ठरविले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पायाभूत सुविधांसाठी कोरियाचे तंत्रज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 5:13 AM