मुंबई - येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे शरद पवार यांनी लेखी पत्राद्वारे कळविले चौकशी आयोगाला कळविलं आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. परंतु, चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे, अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविली. त्यामुळे ते नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
जानेवारी २०१८मध्ये पुण्यातील कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना २३ व २४ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले होते. याआधी २०२० मध्येही पवार यांना साक्ष देण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कोरोनाच्या कारणास्तव पवार आयोगापुढे साक्ष नोंदवू शकले नाहीत. आता, त्यांनी लेखी पत्राद्वारे आयोगाला कळवले आहे. मात्र, ते लवकरच हजर होतील, असे मलिक यांनी म्हटले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश
दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होमक्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पहाता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले.