कोरेगाव-भीमा हिंसेत भाजपजवळचे लोक, गृहमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:04 AM2020-01-31T06:04:58+5:302020-01-31T06:05:01+5:30

या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे.

Koregaon-Bhima violence accuses people of BJP, home minister | कोरेगाव-भीमा हिंसेत भाजपजवळचे लोक, गृहमंत्र्यांचा आरोप

कोरेगाव-भीमा हिंसेत भाजपजवळचे लोक, गृहमंत्र्यांचा आरोप

googlenewsNext

मुंबई : कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भाजपचे जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख यांनी गुरुवारी केलेल्या विधानांवरून हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.
भाजपचे नेते आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देशमुख यांच्या विधानावर तीव्र हरकत घेतली. भाजपचे लोक या हिंसाचारात होते हे देशमुख यांनी सिद्ध करावे आणि तसे ते करू शकले नाहीत तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हान मुनगंटीवार यांनी दिले.

एनआयएची न्यायालयात धाव
पुणे : कोरेगाव-भीमाची दंगल आणि एल्गार परिषदेसंबंधी तपासाची कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मिळावीत, तसेच यापुढे हा खटला एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवावा, यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज सादर केला आहे. शिवाय, या प्रकरणाचा तपास अधिक सविस्तरपणे करता यावा म्हणून एनआयएने नवीन एफआयआर दाखल केला आहे. एनआयएच्या अर्जावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षाला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Web Title: Koregaon-Bhima violence accuses people of BJP, home minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.