दहिसरमध्ये कोविड सेंटर बंद, लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:05 AM2021-04-05T04:05:27+5:302021-04-05T04:05:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहिसरमध्ये जम्बो कोविड सेंटरमध्ये कोविडची लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन असूनही कोविड सेंटर ...

Kovid Center closed in Dahisar, senior citizens line up for vaccinations | दहिसरमध्ये कोविड सेंटर बंद, लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ

दहिसरमध्ये कोविड सेंटर बंद, लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहिसरमध्ये जम्बो कोविड सेंटरमध्ये कोविडची लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन असूनही कोविड सेंटर बंद असल्या कारणामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जवळ जवळ ७० ते ८० लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.

दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये कोविड लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार लस देण्यात येत आहे. अनेक लोकांनी रविवारी लसीसाठी रजिस्ट्रेशन केले असतानादेखील त्यांना दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लस उपलब्ध झाली नाही. पंकज त्रिवेदी हे जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांच्या कुटुंबासह लस घेण्यासाठी आले होते. मात्र रविवार असल्याकारणामुळे जंबो कोविड सेंटर बंद असल्यामुळे लस घेता आली नाही.

अनेक लोकांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये लस घेण्यासाठी नाव नोंदणी केली होती. यामध्ये बहुतांश लोकांना आजची तारीख मिळाली होती. मात्र मात्र सेंटर बंद होते. काही लोकांना या कारणामुळे घरी जावे लागले तर काही जण भगवती हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे मात्र त्यांना २ ते ३ तास रांगेत उभे राहून लस घ्यावी लागली आहे. समीर महाजनदेखील सकाळी ७ वाजता स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांना घेऊन आले होते. मात्र त्यांना दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लस उपलब्ध होऊ शकली नाही.

समीर म्हणाले की आम्ही सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत जम्बो कोविड सेंटरमध्ये उभे होतो. माझ्या ८० वर्षांच्या वडिलांसह मी दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये लस घेण्यासाठी होतो. मात्र तेथील अधिकारी आले आणि म्हणाले की आज रविवार असल्या कारणामुळे तसेच कोविडचे रुग्ण अधिक असल्याकारणामुळे लस मिळू शकणार नाही आणि त्यांनी त्यांना भगवती हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले.

कोट -

आम्ही कोविडच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. कोविडची लस घेण्यासाठी आम्हाला आजची तारीख मिळाली होती. मात्र आम्हाला सांगण्यात आले की कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मात्र आज लस घेऊ शकत नाही. माझ्यासोबात वृद्ध आई-बाबादेखील होते. त्यांनादेखील त्रास सहन करावा लागला.

- पंकज त्रिवेदी, नागरिक

Web Title: Kovid Center closed in Dahisar, senior citizens line up for vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.