कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 08:11 AM2020-09-17T08:11:49+5:302020-09-17T08:12:07+5:30

पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांत सेवा देण्यासाठी ब्रीच कँडी, लीलावती, हिंदुजा, कोकिलाबेन, बॉम्बे आणि फोर्टिस रुग्णालयातील तज्ज्ञ सेवा देतील.

Kovid Kendras will be run by 35 private medical experts, giving priority to places with more capacity | कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य

कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य

Next

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आता पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी शहर, उपनगरातील ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णसेवा देणार आहेत.
पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांत सेवा देण्यासाठी ब्रीच कँडी, लीलावती, हिंदुजा, कोकिलाबेन, बॉम्बे आणि फोर्टिस रुग्णालयातील तज्ज्ञ सेवा देतील. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसह ते काम करतील. या खासगी वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये डॉ. गौतम भन्साळी,
डॉ. जरीर उडवादिया, डॉ. फरहाद कपाडिया, डॉ. तनू सिंघल, डॉ. वत्सल कोठारी, डॉ. राहुल पंडित, डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई, डॉ. अशित हेगडे, डॉ. प्रवीण अमिन आणि डॉ. अब्दुल अन्सारी यांचा समावेश आहे.
वरळी येथील एनएससीआयच्या कोविड केंद्राची जबाबदारी बॉम्बे, ब्रीच कँडी रुग्णालयांतील डॉक्टरांसह डॉ. भन्साळी सांभाळणार आहेत. लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयांतील डॉक्टर वांद्रे-कुर्ला संकुल येथील कोविड केंद्र सांभाळतील. तर कोकिलाबेन आणि नानावटी रुग्णालयांतील तज्ज्ञ गोरेगावच्या नेस्को कोविड केंद्रात काम करतील. फोर्टिसमधील डॉक्टर मुलुंड येथील जम्बो कोविड केंद्रात आणि भाटिया रुग्णालयातील तज्ज्ञ माझगाव येथील रिचर्डसन् कोविड केंद्रात जबाबदारी सांभाळणार आहेत.
खासगी रुग्णालयांच्या बरोबरीने पालिकेच्या या कोविड केंद्रांमध्येही त्याच दर्जाचे उपचार मिळतात, हा विश्वास सामान्यांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी पालिका आणि खासगी वैद्यकीय तज्ज्ञ मिळून काम करतील.

खासगी रुग्णसेवेप्रमाणेच मिळणार सेवा
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, जम्बो कोविड केंद्रांत रुग्णांना खासगी रुग्णसेवेप्रमाणे सेवा मिळेल. शुक्रवारपर्यंत जम्बो कोविड केंद्रांत २५० खाटा वाढविण्यात येतील. त्यातील ५० खाटा सोमवारी वाढविल्या आहेत. पालिका रुग्णालयांमध्येही डॉक्टर आणि परिचारिकांची चमू नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता चाळ, झोपडपट्ट्या, वस्तीप्रमाणेच इमारतींमधील कोविड रुग्णही या जम्बो कोविड केंद्रांत विश्वासार्ह पद्धतीने उपचार घेऊ शकतील.

कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य : संसर्ग अधिक वाढत असल्याने घेतला निर्णय मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आता पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी शहर, उपनगरातील ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णसेवा देणार आहेत.
पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांत सेवा देण्यासाठी ब्रीच कँडी, लीलावती, हिंदुजा, कोकिलाबेन, बॉम्बे आणि फोर्टिस रुग्णालयातील तज्ज्ञ सेवा देतील. पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसह ते काम करतील. या खासगी वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये डॉ. गौतम भन्साळी,
डॉ. जरीर उडवादिया, डॉ. फरहाद कपाडिया, डॉ. तनू सिंघल, डॉ. वत्सल कोठारी, डॉ. राहुल पंडित, डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई, डॉ. अशित हेगडे, डॉ. प्रवीण अमिन आणि डॉ. अब्दुल अन्सारी यांचा समावेश आहे.
वरळी येथील एनएससीआयच्या कोविड केंद्राची जबाबदारी बॉम्बे, ब्रीच कँडी रुग्णालयांतील डॉक्टरांसह डॉ. भन्साळी सांभाळणार आहेत. लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयांतील डॉक्टर वांद्रे-कुर्ला संकुल येथील कोविड केंद्र सांभाळतील. तर कोकिलाबेन आणि नानावटी रुग्णालयांतील तज्ज्ञ गोरेगावच्या नेस्को कोविड केंद्रात काम करतील. फोर्टिसमधील डॉक्टर मुलुंड येथील जम्बो कोविड केंद्रात आणि भाटिया रुग्णालयातील तज्ज्ञ माझगाव येथील रिचर्डसन् कोविड केंद्रात जबाबदारी सांभाळणार आहेत.
खासगी रुग्णालयांच्या बरोबरीने पालिकेच्या या कोविड केंद्रांमध्येही त्याच दर्जाचे उपचार मिळतात, हा विश्वास सामान्यांच्या मनात निर्माण व्हावा यासाठी पालिका आणि खासगी वैद्यकीय तज्ज्ञ मिळून काम करतील.

खासगी रुग्णसेवेप्रमाणेच मिळणार सेवा
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, जम्बो कोविड केंद्रांत रुग्णांना खासगी रुग्णसेवेप्रमाणे सेवा मिळेल. शुक्रवारपर्यंत जम्बो कोविड केंद्रांत २५० खाटा वाढविण्यात येतील. त्यातील ५० खाटा सोमवारी वाढविल्या आहेत. पालिका रुग्णालयांमध्येही डॉक्टर आणि परिचारिकांची चमू नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता चाळ, झोपडपट्ट्या, वस्तीप्रमाणेच इमारतींमधील कोविड रुग्णही या जम्बो कोविड केंद्रांत विश्वासार्ह पद्धतीने उपचार घेऊ शकतील.

Web Title: Kovid Kendras will be run by 35 private medical experts, giving priority to places with more capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.