कोकणात जाणाऱ्यांसाठी कोविडची चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 03:19 AM2020-08-22T03:19:47+5:302020-08-22T03:19:53+5:30

या निर्बंधांमुळे भाविकांच्या कुठल्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.

Kovid test is mandatory for those going to Konkan | कोकणात जाणाऱ्यांसाठी कोविडची चाचणी बंधनकारक

कोकणात जाणाऱ्यांसाठी कोविडची चाचणी बंधनकारक

Next

मुंबई : गणेशोत्सवासाठी १२ आॅगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना कोविड-१९ ची चाचणी बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. राज्य सरकारने घातलेले निर्बंध योग्यच आहेत. या निर्बंधांमुळे भाविकांच्या कुठल्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
शासनाने ४ आॅगस्ट २०२० रोजी काढलेली अधिसूचना न्या. के.के. तातेड व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने योग्य ठरवली. ‘कोकणातील लोक सुरक्षित राहावेत व तेथील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा संपर्कात येऊ नये, यासाठी राज्य सरकारने ही अधिसूचना काढली,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.

Web Title: Kovid test is mandatory for those going to Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.