प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू होणार कोविड लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:32+5:302021-05-10T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- जी उत्तर वॉर्डमधील करण्यात आलेल्या पालिकेच्या नावीन्यपूर्ण ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- जी उत्तर वॉर्डमधील करण्यात आलेल्या पालिकेच्या नावीन्यपूर्ण ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असताना आता पालिकेच्या नाट्यगृहात लसीकरण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सदर लसीकरण केंद्र सुरू होत असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग क्रमांक १ चे विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांनी ‘लोकमत’ला दिली.
बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोविडमुळे बंदच आहे. त्यामुळे येथील जागेचा सुयोग्य वापर करीत आता या नाट्यगृहात कोविड लसीकरण केंद्र सुरू होत आहे.
बोरिवली-दहिसरमधील नागरिकांसाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने या नाट्यगृहात नवीन कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. येथील नागरिकांसाठी येथे लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी आमदार विलास पोतनीस यांनी मुंबई महानगरपालिके सातत्याने पाठपुरावा केला होता.
शिवसेनेच्या प्रयत्नाने सदर लसीकरण केंद्र लवकरच कार्यान्वित होत असून आमदार विलास पोतनीस यांनी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील सुविधांची पाहणी केली.