चिंचपोकळी उत्सव मंडळातर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान; चालक राजेश कांबळे यांना मरणोत्तर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:16 AM2020-08-28T01:16:55+5:302020-08-28T01:17:02+5:30
बुधवारी मंडळाच्या वतीने लालबाग-परळ भागातील वैकुंठधाम रथाचे चालक राजेश कांबळे यांना मरणोत्तर कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या आईने हा सन्मान स्वीकारला.
मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने २५ ते ३० आॅगस्ट दरम्यान १०१ कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात सेवाकार्य करून आपले मोलाचे योगदान देणाऱ्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. बुधवारी मंडळाच्या वतीने लालबाग-परळ भागातील वैकुंठधाम रथाचे चालक राजेश कांबळे यांना मरणोत्तर कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या आईने हा सन्मान स्वीकारला.
कोरोनाच्या काळात स्वत:च्या कुटुंबाची चिंता न करता बेस्ट परिवहन उपक्रमात सेवा पुरविणाºया महेश सावंत-निरीक्षक, विनोद सिंग-निरीक्षक, मिलिंद पावसकर, अनिल आडविलकर, मन्सूर तांबोळी, आशीष सकपाळ, शंकर घाडी व शरद मुटके या बसकंडक्टर व ड्रायव्हर यांचा यावेळी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पालिकेचे कर्मचारी शांताराम भोसले, तेजा हरिया, कैलास गवळी संगीता कांबळी, नीलेश चांदोस्कर, ललिता कांबळे, प्रमिला मोरे, रोहिणी पवार, सुभाष जाधव व शुभांगी जंगम यांचाही सन्मान करण्यात आला.