Kranti Redkar: मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या; क्रांती रेडकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 01:35 PM2021-10-26T13:35:51+5:302021-10-26T13:36:26+5:30

Kranti Redkar: "मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे"

Kranti Redkar says I am proud to be Marathi death threats against me and children | Kranti Redkar: मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या; क्रांती रेडकरचा खुलासा

Kranti Redkar: मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या; क्रांती रेडकरचा खुलासा

googlenewsNext

मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे. नवाब मलिकांच्या आरोपांवर बोलण्याची मला काहीही गरज नाही. त्यांना खरंतर वेळच उत्तर देईल, असं प्रत्युत्तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. 

समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून त्यात काहीच तथ्य नाही. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा आहेत. मीडिया ट्रायल करुन आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ते ट्विटरवर का पोस्ट करतात? त्यांनी कोर्टात जावं, असं क्रांती रेडकर म्हणाल्या. यासोबत हे संपूर्ण प्रकरण सुरू झाल्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे. 

"मी मराठी आहे आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे. पण मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत हेही सत्य आहे. सोशल मीडिया, फोन कॉल्सवरुन तुम्हाला जीवे मारु, चौकात जीवंत जाळू अशा धमक्या येत आहेत. या धमक्यांचे सर्व स्क्रिनशॉट आमच्याकडे आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स आहेत आणि त्याची सायबर सेलच्या माध्यमातून यामागचा खरा सूत्रधार कोण हे शोधून काढणार आहे. समीर वानखेडेंना बदनाम करण्यासाठी यामागे एक संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे", असं क्रांती रेडकर म्हणाल्या. 

नवाब मलिक यांनी आज जाहीर केलेल्या पत्रावरही जोरदार टीका रेडकर यांनी केली. ज्यानं पत्र लिहिलंय त्यानं समोर येऊन आरोप करावा. सत्य आहे तर असं मागच्या मार्गानं का सांगायचं? थेट समोर येऊन जाहीर करावं. सत्याचा मार्ग अनेकांना खटकतो. पण शेवटी सत्याचाच विजय होतो. आम्ही केवळ ट्विटरबाजी करत नाही. नवाब मलिकांना योग्यवेळी उत्तर दिलं जाईल, असंही क्रांती रेडकर म्हणाल्या. 

Web Title: Kranti Redkar says I am proud to be Marathi death threats against me and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.