मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 02:47 PM2023-05-17T14:47:35+5:302023-05-17T14:49:23+5:30

मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई केलेली नसल्याचे दिसून आले.

Krantinagar will be swept away in Mithi's flood | मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

googlenewsNext

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीतला गाळ पूर्ण काढला जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीलगतचे क्रांतीनगर आणि इतर परिसर पुराच्या पाण्याखाली जातो. यावर्षीही फार वेगळी परिस्थिती नसून, यावेळीही विमानतळाजवळच्या मिठी नदीमधील गाळ खोलपर्यंत काढण्यात आलेला नाही. परिणामी यंदाच्या वर्षीही विमानतळालगतचे क्रांतीनगर आणि परिसर पाण्याखाली जाण्याची भीती  माजी मंत्री नसीम खान यांनी व्यक्त केली आहे. मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई केलेली नसल्याचे दिसून आले.

-  पावसाळा येण्याअगोदर मिठी नदी तसेच मोठ्या नाल्यांची पाहणी नसीम खान यांनी केली.
-  मिठी नदी व नाले साफसफाई करणारे ठेकेदार व मनपाचे काही अधिकारी यांच्या संगनमतामुळे व निष्काळजीपणामुळे पावसाळा येण्याअगोदर साफसफाई झाली नाही. 
-  साफसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचे खान यांचे म्हणणे आहे.
-  काही काही ठिकाणी ६ फूट खोलवर असलेल्या नाल्यामध्ये फक्त एक फुटापर्यंत गाळ काढण्यात आला आहे तर उर्वरित ५ फूट नाल्यांमधील गाळ तसाच आहे.

Web Title: Krantinagar will be swept away in Mithi's flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.