कृपाशंकर यांच्यावर आरोपपत्र दाखल
By admin | Published: April 5, 2015 01:52 AM2015-04-05T01:52:39+5:302015-04-05T01:52:39+5:30
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग व त्यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल झाले आहे.
मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग व त्यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. या आरोपपत्राची तपासणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाकडे ते वर्ग केले जाईल. या प्रक्रियेपाठोपाठ कृपाशंकर सिंग व त्यांच्या कुटुंबियांना या आरोपपत्राची प्रत घेण्यासाठी न्यायालयात बोलावले जाईल. या आरोपपत्रात सिंगच्या मिळकतीपेक्षा १९.०% अधिक बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सिंग व त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कृपाशंकर यांची बेहिशेबी मालमत्ता असून यात कुटुंबियांचाही सहभाग असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका संजय दिनानाथ तिवारी यांनी दाखल केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार एसीबीने याचा अहवालही सादर केला. मात्र तो अहवाल न्यायालयाने अमान्य केला. तसेच या तपासाची सुत्रे न्यायालयाने पोलीस आयुक्तांकडे सोपवली. हा तपास करताना कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्याचीही मुभाही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिली होती.