मुंबई - योग्य मार्गदर्शन आणि जिद्दीच्या जोरावर माणूस यशाचे शिखर सहज गाठू शकतो. याचेच उदाहरण यंदाच्या राज्य मंडळाच्या, आयसीएसई, सीबीएसई मंडळांच्या आतापर्यंत लागलेल्या निकालांमध्ये दिसून आले. अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी अडचणींवर मात करत उत्तम यश मिळवून दाखविले आहे. एकाग्रतेचा भाव आणि अतिचंचलपणाचा आजार असलेल्या क्रिश शाह याने आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन हे खरे करून दाखवले आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे त्याला एमबीए व्हायचे आहे.
मुलुंडच्या क्रिश शिरीष शाह या मुलाबाबतीत. अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसाॅर्डर (एडीएचडी म्हणजेच- एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता समस्या) आणि बिहेव्हिअरल इश्यूज (वर्तवणूक समस्या) यांमुळे क्रिश जेव्हा पहिली-दुसरीत होता, तेव्हा त्याला अक्षरे समजत नव्हती. बोलताना तो अडखळायचा. मात्र चाइल्ड लर्निंग सेंटरचे संस्थापक असलेल्या डॉ सुमित शिंदे यांच्या अचूक समुपदेशनाने त्याची वर्तवणूक समस्या दूर होऊन त्याची शैक्षणिक कामगिरी सुधारली. ज्या विषयात उत्तीर्ण व्हायला त्याला अडचण यायची, त्या गणितासारख्या विषयात तो चांगले गुण मिळवू लागला अशी माहिती क्रिशची आई कोमल शाह यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भारीच! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने कोरोनाला असं लावलं पळवून
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाग्रस्तांसाठी 'हे' औषध ठरतंय संजीवनी; 79 टक्के धोका झाला कमी
CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल
धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ