कृष्णा, तानसा खणताहेत मेट्रोचे भुयार; मेट्रो-३साठी ४१५ मीटर भुयारीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:37 AM2018-02-11T02:37:19+5:302018-02-11T02:37:31+5:30

नद्यांचे पाणी ज्या वेगाने वाहते, त्याच वेगाने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. विशेषत: मेट्रोचे भुयार खणण्याकरिता जी यंत्रे म्हणजेच, ज्या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) वापरण्यात येत आहेत, त्या यंत्रांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नद्यांची नावे दिली आहेत.

Krishna, mining the tansa; Complete the 415 meter hybridization for Metro -3 | कृष्णा, तानसा खणताहेत मेट्रोचे भुयार; मेट्रो-३साठी ४१५ मीटर भुयारीकरण पूर्ण

कृष्णा, तानसा खणताहेत मेट्रोचे भुयार; मेट्रो-३साठी ४१५ मीटर भुयारीकरण पूर्ण

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : नद्यांचे पाणी ज्या वेगाने वाहते, त्याच वेगाने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. विशेषत: मेट्रोचे भुयार खणण्याकरिता जी यंत्रे म्हणजेच, ज्या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) वापरण्यात येत आहेत, त्या यंत्रांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नद्यांची नावे दिली आहेत. पॅकेजप्रमाणे यंत्रांना नद्यांची नावे देण्यात आली असून, ही सर्व यंत्रे सर्व शक्तिनिशी वेगाने कार्यान्वित आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून प्राप्त माहितीनुसार, जागतिक पातळीवर टीबीएम्सना नाव देण्याची पद्धत आहे. त्यानुसार, ‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी वापरण्यात येणाºया टीबीएम्सचे महाराष्ट्रातील नद्यांच्या नावावरून नामकरण करण्यात
आले आहे. मेट्रो-३ प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी एकूण ५२ किलोमीटरपर्यंतचे भुयारीकरण करण्यात येणार आहे. टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम)द्वारे भुयारीकरण करण्यात येणार असून, भुयारीकरणासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत अतिशय सुरक्षित व जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आहे.

मुंबईकरांसाठी दुसरी लाइफलाइन
- रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. मुंबईसाठी आता रेल्वेशी समांतर अशी मेट्रो रेल्वेच्या रूपाने दुसरी लाइफलाइन आजच्या क्षणी क्रमप्राप्त ठरत आहे. या दुसºया लाइफलाइनचा पर्याय मेट्रोच्या रूपात
मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल, असा दावा एमएमआरसीएने केला आहे.
- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प भारताची
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचे चित्र
बदलू शकतो.
- ३३.५ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी कमी करू शकतो. रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवू शकतो, असा विश्वास एमएमआरसीएला आहे.
- भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या समान भागीदारीमध्ये एक संयुक्त प्रकल्प म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.

प्राथमिक भुयारीकरण पूर्ण
- मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकूण १७ टीबीएम्सचा वापर होणार आहे. त्यापैकी ७ मशिन्स मुंबईत दाखल झाल्या आहेत. सातही टीबीएम्स मुंबईतील विविध परिसरात बांधण्यात आलेल्या टीबीएम शाफ्टमध्ये उतरविल्या आहेत. ४ टीबीएम्सनने प्राथमिक भुयारीकरण पूर्ण झाले असून, आतापर्यंत एकूण ४१५ मीटर भुयारीकरण झाले आहे.

- मेट्रो प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल.
- प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोईसुविधा यामुळे उपलब्ध होतील.
- मेट्रो मार्गावर २७ स्थानके असतील. हा मार्ग मुंबईतील ६ महत्त्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, ३० शैक्षणिक संस्था, ३० मनोरंजनाची ठिकाणे, तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इत्यादींशी जोडण्यात येईल.
- पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील, ज्यामध्ये एक मोनोरेलसाठी व एक वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१साठी असेल.

टीबीएम्सची नावे
१ - सूर्या, २ - वैतरणा, ३ - तानसा,
४ - कृष्णा, ५ - गोदावरी,
६ - तापी, ७ - वैनगंगा

वर्णन २०२१ २०३१ २०४१
दररोजच्या वाहन फेºयांमध्ये होणारी घट ४,५६,७७१ ५,५४,५५६ ६,६५,४६८
इंधनाच्या वापरात दररोज होणारी बचत - पेट्रोल व डिझेल (लीटरमध्ये / दिवस) २,४३,३९० २,९५,४९५ ३,५४,५९३
वाहनांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दररोज होणारी सरासरी बचत (रुपये लाखात) १५८.१४ १९१.९९ २३०.३९
वाहनांच्या खेपांमध्ये घट झाल्याने दरवर्षी होणारी प्रदूषणातील घट (टन/प्रति वर्ष) १२,५९० १५,२८५ १८,३४२

Web Title: Krishna, mining the tansa; Complete the 415 meter hybridization for Metro -3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.