कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:14 AM2018-05-18T05:14:09+5:302018-05-18T05:14:09+5:30

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

Krishna, Mula-Mutha rivers will be clean | कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ

कृष्णा, मुळा-मुठा नद्या होणार स्वच्छ

Next

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यांतील ४८ नद्या व समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिºया व गणपतीपुळे समुद्रकिनारे यांचा समावेश या मोहिमेत आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने १९ राज्यांतील २४ नद्या आणि २४ समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा या नद्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील मिºया व गणपतीपुळे या समुद्रकिनाºयांचा समावेश आहे. या स्वच्छता मोहिमेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १९ टीम बनवल्या आहेत.
१९ राज्यातील २४ नद्या आणि २४ समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १९ टीम बनविल्या आहेत. यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल एजन्सी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्रकिनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही यात सामवेश आहे. या टीम स्थानिक शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना, स्थानिक समूहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी पर्यावरण विभागाने इको क्लब शाळेचा सहभाग घेतला आहे. विभागाच्या वतीने राष्ट्रीय हरित कॉर्प्स कार्यक्रमांतर्गत या मोहिमेसाठी आर्थिक मदत दिली जाईल.
निवडण्यात आलेल्या स्थळांच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूही स्वच्छ करण्यात येतील. ही मोहीम १५ मेपासून सुरू करण्यात आली असून, ती ५ जूनपर्यंत राबविली जाईल.

Web Title: Krishna, Mula-Mutha rivers will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.