Join us

कृष्ण जन्मला गं सखे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:31 PM

Mumbai: मुंबई शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो.

मुंबई - शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो. आपल्याला होणाऱ्या बाळाचा किती वाजता जन्म झाला पाहिजे याची विचारणासुद्धा काही पालक डॉक्टरांकडे करतात. मात्र अशा पद्धतीने प्रसूती करणारे फार कमी असतात. मात्र नॉर्मल पद्धतीने काही महिलांची प्रसूती या दिवशी होते त्यांना मात्र मोठा आनंद झालेला असतो. काहीजणांची अजून अशी धारणा आहे की, या दिवशी बाळाचा जन्म झाला म्हणजे शुभमुहूर्तावर जन्म झाला आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीला ६ मुली, ८ मुलांचा जन्म    शहरात जे. जे. समूह रुग्णालय सरकारी आहे. त्यामध्ये सेंट जॉर्जेस रुग्णालय आणि जी.टी. रुग्णालय आणि कामा रुग्णालयाचा समावेश आहे.     त्यापैकी जे. जे. रुग्णालय आणि कामा रुग्णालय या दोन रुग्णालयात स्त्रीरोग विभाग आहे. या दोन्ही रुग्णालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीला ६ मुली, ८ मुलांचा जन्म झाला.   

१५ नॉर्मल, ७ सिझरगेल्या काही वर्षात सिझर प्रसूती करण्याच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र हा ट्रेंड सरकारी रुग्णालयात फारसा आढळून येत नाही. त्यामुळे हे चित्र पहिले तर लक्षात येते की १५ प्रसूती या नॉर्मल पद्धतीने करण्यात आल्या आहेत, तर ७ प्रसूती या सिझर पद्धतीने करण्यात आल्या आहेत.

नायर रुग्णालयात ६ मुली आणि २ मुलांचा जन्ममुंबई पालिकेच्या अखत्यारितील नायर रुग्णालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीला ६ मुली, २ मुलांचा जन्म झाला आहे.   

कामा रुग्णालय हे महिला आणि मुलासाठी आरोग्य उपचाराचे स्वतंत्र रुग्णालय आहे. त्यामुळे या ठिकाणी अनके महिला प्रसूतीसाठी नावनोंदणी करतात. आमच्याकडे आईची आणि बाळाची स्थिती बघून प्रसूती कशी केली जावी हे डॉक्टर ठरवितात.  - डॉ. तुषार पालवे, अधीक्षक, कामा रुग्णालय 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटलजन्माष्टमी