गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी कुलकर्णी

By Admin | Published: March 18, 2015 02:10 AM2015-03-18T02:10:39+5:302015-03-18T02:10:39+5:30

राज्य सरकारने मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी आणि ठाणे आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश येताच पदभारही स्वीकारला.

Kulkarni becomes the chief of crime branch | गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी कुलकर्णी

गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी कुलकर्णी

googlenewsNext

मुंबई : राज्य सरकारने मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी आणि ठाणे आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश येताच पदभारही स्वीकारला. कुलकर्णी यांनी दिल्ली, अरुणाचल प्रदेश आणि मुंबईत तब्बल ११ वर्षे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कामगिरी बजावली आहे.
१९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले कुलकर्णी मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. कायद्याची पदवीही त्यांच्याकडे आहे. सदानंद दाते यांची सीआयएसएफमध्ये बदली झाल्याने गुन्हे शाखेचे सहआयुक्तपद रिक्त होते. आज या पदाचा पदभार स्वीकारताच गुन्हे शाखेला साजेसे काम करेन, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. मनुष्यबळ कमी असले तरी आहे ते कुशल आहे की नाही हे महत्वाचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Kulkarni becomes the chief of crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.