Join us

कुंभार बावडीला मिळणार नवसंजीवनी

By admin | Published: May 21, 2015 12:09 AM

खारघर सेक्टर-१२ मधील शनि मंदिराजवळ ही विहीर आहे. दीडशे वर्षांपूर्वी खारघर परिसरात कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी आदी गावांतील शेतकरी आपल्या जमिनी कसत होते.

वैभव गायकर - पनवेलखारघरमधील सर्वात जुन्या कुंभार बावडीला नवसंजीवनी मिळणार असून या विहिरीची साफसफाई करून पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे . ‘खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेने सिडकोच्या मदतीने पुढाकार घेतला आहे . खारघर सेक्टर-१२ मधील शनि मंदिराजवळ ही विहीर आहे. दीडशे वर्षांपूर्वी खारघर परिसरात कोपरा, खारघर, बेलपाडा, मुर्बी आदी गावांतील शेतकरी आपल्या जमिनी कसत होते. त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी या विहिरीवर येत असत. पाळीव प्राण्यांसह, चार गावांतील रहिवाशांची तहान भागवणारी बावडी अशी कुंभार बावडीची ओळख होती. कालांतराने सिडकोने नवी मुंबई प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या, त्यामध्ये खारघरचा देखील समावेश होता. भरावामध्ये ही विहीर गाडली गेली. मात्र पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या या बावडीला नवसंजीवनी देण्याचे काम ‘खारघरचा राजा ट्रस्ट’ने केले आहे. च्६० ते ७० फूट खोल असलेल्या या विहिरीतून आत्तापर्यंत १२ ते १५ टन गाळ, माती, दगड बाहेर काढण्यात आले आहे. च्लवकरच ही विहीर स्वच्छ होईल व खारघरवासीयांना त्यातून पाणीपुरवठा केला जाईल, अशी आशा खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केली.अशा जुन्या विहिरींचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आम्ही त्यासाठी पाठपुरावा केला, सिडकोने देखील मदत केली आहे. या बावडीचे काम पूर्ण झाल्यास खारघरमधील सर्वात मोठ्या सेक्टर-१२ सह अर्ध्या खारघरचा पाणी प्रश्न सुटणार आहे. शहरामधील इतर विहिरी, तलावांचे याच धर्तीवर संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. - विजय पाटील, अध्यक्ष, खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टच्राज्य सरकारदेखील जलयुक्त शिवार योजना राबवून पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा योजना ग्रामीण भागापुरत्याच मर्यादित न ठेवता शहरामध्ये देखील राबविल्यास पाणीपुरवठा खंडित झाल्यास अशा नैसर्गिक स्रोतांचा वापर करता येणार आहे.च्खारघरमध्ये सिडको २४ तास पाणीपुरवठा करते. मात्र एखाद वेळी पाणीपुरवठा खंडित झाल्यास रहिवाशांचे हाल होतात. अशा वेळी शहरामधील जुन्या नैसर्गिक जलस्रोतांचा वापर केल्यास पाणीटंचाई कधीही भासणार नाही.