मुंबई : माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी लागलेल्या आगीत जिवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाºया कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सत्कार केला.
कुणाल जाधव यांच्या धाडसाचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवरून कौतुक केले. बुधवारी त्यांनी जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाल, श्रीफळ, तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन जाधव यांचा सत्कार केला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या सत्कारास सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते. जाधव हे जीएसटी भवन येथे शिपाई म्हणून काम करतात. आग लागली, तेव्हा ते तळमजल्यावर होते. आगीची झळ राष्टÑध्वजाला बसू नये, म्हणून जिवाची पर्वा न करता ते धावतच नवव्या मजल्यावर गेले व सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज खाली घेऊन आले.जीएसटी भवनला लागलेल्या आगीत जिवाची पर्वा न करता राष्ट्रध्वजाची शान राखणाºया कुणाल जाधव यांचा सत्कार करताना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे. सोबत सार्वजनिक बांधकाममंत्रीअशोक चव्हाण.