'लोगों की लूटने कमाई, साडी वाली दीदी आयी', कुणाल कामराचं आणखी एक गाणं, कुणाला केलं टार्गेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:04 IST2025-03-26T15:59:13+5:302025-03-26T16:04:09+5:30
Kunal Kamra Song Video: राजकीय वादात सापडलेल्या स्डॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आता आणखी एक गाणे पोस्ट केले आहे. या गाण्यातून त्याने एका केंद्रीय मंत्र्याला टार्गेट केले आहे.

'लोगों की लूटने कमाई, साडी वाली दीदी आयी', कुणाल कामराचं आणखी एक गाणं, कुणाला केलं टार्गेट?
Kunal Kamra Song: आधीच एका गाण्यावरून वाद तापलेला असताना आता स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने नवीन गाणे शेअर केले आहे. या गाण्यातून त्याने नोकरदार वर्गाकडून आयकराच्या माध्यमातून वसूल केला जात असलेल्या पैशांबद्दलचा मुद्दा मांडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक विडंबन गाणे गायले. या गाण्यावरून मोठा राजकीय धुराळा उडाला. त्यातून स्टुडिओची तोडफोडही करण्यात आली. हे सगळे प्रकरण तापलेलं असतानाच आता कुणाल कामराने नवीन गाणे शेअर केले आहे.
हेही वाचा >> 'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन
कुणाल कामराच्या नवीन गाण्यात काय?
कुणाल कामराने त्या शोमधील दीड मिनिटांचा व्हिडीओ शेर केला आहे, ज्यात एक गाणेही आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल कुणालने विडंबन गीत लिहिले आहे, ज्यातून निर्मला सीतारामन या लोकांची कमाई लूटत असल्याचे म्हटले आहे. निर्मला सीतारामन यांना साडीवाली दीदी म्हणत कुणाल कामराने हे विडंबन गीत तयार केले आहे.
कुणाल कामराचे नवीन गाणे
🍿 🍿 🍿 pic.twitter.com/KiDBbvaxSL
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 26, 2025
शिंदेंवरील गाण्याप्रकरणी पोलिसांचे समन्स
मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खार पोलिसांनी कुणाल कामरा याला समन्सही बजावलेले आहे. पण, हजर होण्यासाठी कुणाल कामराने मुंबई पोलिसांकडे आठ दिवसांचा वेळ मागितला आहे.
कुणाल कामराचा द हॅबिटेट स्टुडिओमध्ये शो झाला होता. या शोमध्ये त्याने काही विडंबनात्मक गाणी सादर केली. त्यातील एक गाणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करताही त्याने एक गाणे सादर केलेले आहे.
वाद धुमसत असतानाच आता कुणाल कामराने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल गाणे पोस्ट केले आहे. त्यामुळे गाण्यावरून भाजपकडून काय भूमिका मांडली जाणार हे बघावं लागेल.