चेन्नई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे अडचणीत आलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मी तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी मुंबईत परतलो तर मुंबई पोलिस आम्हाला अटक करतील. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे आहे, असे कामराने याचिकेत म्हटले होते.
यापूर्वी पोलिसांनी कामराला दोन समन्स बजावले आहेत. कामराला ३१ मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचवेळी विधिमंडळात त्याच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील वनूर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समाधानासाठी बॉण्ड भरावा लागेल या अटीवर न्यायालयाने कामराला दिलासा दिला.