Join us

कुर्ला-शीव पादचारी पुलासाठी स्थानिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:36 AM

कुर्ला-शीव स्थानकादरम्यान नवीन पूल उभारण्याचे काम त्वरेने पूर्ण करावे, यासाठी कुर्ला परिसरातील नागरिकानी सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : कुर्ला-शीव स्थानकादरम्यान नवीन पूल उभारण्याचे काम त्वरेने पूर्ण करावे, यासाठी कुर्ला परिसरातील नागरिकानी सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमत अडीच हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. २६ मे रोजी मध्य रेल्वेने कुर्ला-शीव दरम्यान असलेला पादचारी पूल धोकादायक असल्यामुळे पाडला होता.कुर्ला पश्चिमेतील अंबिकानगर आणि पूर्वेकडील स्वदेशी मिल, कसाई वाडा येथील स्थानिकांच्या वापरात असलेला पूल मध्य रेल्वेने पाडला. रोज सुमारे दहा हजार प्रवासी पुलाचा वापर करत होते. कुर्ला परिसरातील नागोबा चौक, खंडाळा चाळ, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी आणि ताकिया वॉर्ड मार्केट येथे ये-जा करण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल होता. तो पाडण्यात आल्यामुळे स्थानिकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे. पुलाच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करावे, यासाठी मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.रेल्वे रूळ ओलांडताना विनीत माने या युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ आणि पूल उभारणीसाठी सह्यांच्या मोहिमेत अडीच हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. प्रशासनाने अन्य अपघात रोखण्यासाठी तातडीने नवीन पादचारी पूल बांधवा. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हा मृत्यू झाल्याचे मुंबई यात्री संघाचे उपाध्यक्ष विनायक शिंदे यांनी केला आहे.या प्रकरणी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा सार्वजनिक पादचारी पूल असल्यामुळे महापालिका आणि मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने पूल उभारण्यात येणार आहे.>पूल पाडल्यानंतरया ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे रूळ ओलांडत आहेत.