कुर्ला स्थानक परिसर झाला मोकळा; अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 13:30 IST2024-12-21T13:30:14+5:302024-12-21T13:30:58+5:30
लोकमत इम्पॅक्ट; 'लोकमत'च्या १२ डिसेंबरच्या अंकात 'कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर' या शिर्षकांतर्गत वृत्त प्रसिद्ध झाले होते.

कुर्ला स्थानक परिसर झाला मोकळा; अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाने शुक्रवारी कुर्ला येथील स. गो. बर्वे मार्ग, तसेच कुर्ला रेल्वेस्थानक मार्गावर कारवाई करत पदपथांवर उभारलेली अनधिकृत बांधकामे हटवली.
'लोकमत'च्या १२ डिसेंबरच्या अंकात 'कुर्ला येथील बजबजपुरीचा मुद्दा ऐरणीवर' या शिर्षकांतर्गत वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामध्ये वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्या अनुषंगाने पालिकेने या मार्गावरील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना शुक्रवारी दणका दिला.
दुकानाबाहेरील लाद्या, शेड, बाकडे हटविली
या वेळी दुकानाबाहेर बसवलेल्या लाद्या, अनधिकृत शेड, लाकडी बाकडे, दुकानाबाहेर लटकवलेले साहित्य यांच्यावर कारवाई करण्यात आली. कुर्त्यात ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या बस अपघातामुळे एकूणच रेल्वे स्थानकाबाहेरील बजबजपुरी, पदपथावरील अतिक्रमणे, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकेचा धूळ खात पडलेला प्रस्ताव, फेरीवाल्यांचा सुळसुळाट, रिक्षा चालकांची मनमानी असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.